Tuesday, October 30, 2012

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?


मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते? काय पुण्य असले कि हे घर बसल्या मिळते...

प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी. तशीच सुखाची कल्पना पण वेगळी. काही म्हणतील पैसा तर काही म्हणतील माणसं..... घर गाडी दागिने वैगरे वैगरे बरेच काही....

पण माझे म्हणणे आहे सुखाची जर कोणी जननी असेल तर ती भूख आहे. म्हणजे, बघा घर, गाडी, रिमोट, टीवी हे सगळं जरी असले(अर्थात ह्या दुय्यम व्याख्या आहेत ) तरी सुख हे माणसाला तेव्हा...
जाणवते जेव्हा त्याची भूक भागते.. मग ती पोटाची असो कि शरीराची....

परवा दुपारी मला इतकी भूक लागलेली. पण कामामुळे मला जेवता येत नव्हते. शेवटी मला १० मिनिटे मिळाली आणि मी डब्बा उघडला.. मस्त पहिला घास पोटात गेला आणि तोंडून निघाले
"देवा मनापासून धन्यवाद ह्या एका घासाने मला सुख म्हणजे काय ते कळले"

म्हणून मी सांगतोय प्रत्येक गोष्टीची भूख ठेवा. मग ती पोटाची असो, शरीराची असो, ज्ञानाची असो व तुमच्या ईछ्या, आकांष्याची असो. पण भूक ठेवाच. कारण जेव्हा तुमचे मन तृप्त तेव्हा तुम्ही खरया अर्थाने सुखी असता....

आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते? भूख भागली कि जे मिळते, ते सुख असते


-आलेख पाटणकर