Tuesday, July 24, 2012

दाम्बिकपणा


माझा आजचा स्टेटस हा चालू असलेल्या दाम्बिकपणा वर आहे ना कि देवावर.. माझा हि देवावर तुमच्या इतकच प्रेम आहे.

दररोज शॉवर ने अंघोळ कळणाऱ्या एखाद्यावर एकदम BMC चा पाईप फुटून पाण्याचा मारा झाला तर त्याला जसं वाटत असेल तसं आता जगात फक्त एकालाच वाटत असेल...
आणो तो आहे....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपला लाडका शंकर देव.....

माझ्या सर्व मित्र परिवाराला श्रावणी सोमवारच्या शुभेच्या.....

आणि शंकर देवा अजून ३ सोमवार आहेत रे..... हे असाच प्रेम चालू राहिला तर गणपत्ती बाप्पा पण रक्षण नाही करू शकणार

देव आपला लाडकाच आहे.. फक्त श्रद्धेच्या पोटी त्याच्यावर प्रेम थापू नका........

सबकुच



आजचा स्टेटस तुम्हाला थोडा अश्लील वाटेल.. पण हि गोष्ट माझ्या बरोबर घडलेली आणि एक मजेशीर गोष्ट आहे म्हणून शेअर करतोय... प्लीज पूर्ण वाचा

६ एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी मालाड ला कामाला होतो.तिथे नवीन असल्यामूळे मला तिथल्या आजूबाजूच्या एरियाचा काही पत्ता नव्हता. तेव्हा बाईक नसल्याने मी बस ने जायचो. अर्थात बसला तुडूंब गर्दी असायची. लोकक अक्षरक्षा चिटकून उभी राहायची. एकदा मी हि असाच उभा होतो. माझ्या बाजूला एक सुंदर मुलगी आली. त्यात मुंबई मध्ये एक सवय आहे. खूप गर्दी असेल तर लोकक पैसे पुढच्या माणसा कडे देतात आणि त्याला सांगतात कि conductor ला हे पैसे द्या आणि ह्या ह्या स्टोप चा तिकीट सांगा... ..

तर त्या मुलीने माझ्या कडे पैसे दिलेत आणि म्हणाली " सबकुच निकालो"
मी गोंधळंलो , मी म्हणालो "क्या? आपको क्या चाहिये"
ती परत म्हणाली " प्लीज सबकुच निकालो ना?" ह्या वेळी ती जरा त्रस्त वाटत होती...
माझ्या मनात विचार आला अशी काय हि.... मग मी विचार केला.. पैसे पुढे देऊन तर बघू काय होतं आणि मी ते पैसे पुढे पास केलेत आणि मी हि पुढच्या माणसाला म्हणालो " प्लीज सबकुच निकालो"....
मनात असंख्य विचार चालू होते कि हि मुलगी असं कसं विचारू शकते...
आणि हे विचार चालू असताना मगासाच्याच माणसाचा आवाज आला" ये लो भाई साहब" असं बोलून त्याने माझ्या पुढे तिकीट केलं...
मी हि निमूट पणे ती तिकीट घेऊन तिला दिलं... आता तर मी पूर्णच गोंधळंलेलो

मग मी office ला गोंधळंलेल्या अवस्थेत पोहचलो आणि तिथल्या हाउसकीपिंग वाल्या मुलाला विचारल कि "काय रे बाबा इथे सबकुच नावाचं काही आहे का "
तो हसला आणि म्हणाला "हो साहेब २ स्टोप सोडलेत ना तर एक सबकुच मंझील नावाचा स्टोप आहे लोकक त्याला सबकुच म्हणतात"

आणि सगळं कोड सुटलं...

मालाडला इन ओर बिट आधी एक हॉटेल आहे त्याचा नाव सबकुच मंझील आहे :)

Thursday, July 19, 2012

सुनिता विल्यम्स आणि आम्ही



सुनिता विल्यम्स.
अर्थात मला पण माझा स्टेटस ची सुरवात अशीच करून देत कि. "एक भारतीय वंशाची अंतराळवीर" वैगरे वैगरे.......
पण तुम्हाला माहित्ये तिचे बाबा एक गुजराती होते आणि एक भारतीय.. कालांतराने ते US ला गेले आणि त्यांनी तिथे Slovenian मुलीशी लग्न केलं. त्यांना झाली सुनिता. बर त्या सुनिता ने विल्यम्स नावाच्या मुलाशी लग्न केलं जो आहे US चा..
त्या हून कमी कि काय ती आता ज्या मिशन साठी अंतराळात गेलीये त्याचा भारताशी काडीमात्र संबद्ध नाही. पण तरी भारत प्रत्येक वेळी हेच गाण गुणगुणत बसलाय कि भारतीय वशांची मुलगी अंतराळात गेलीये.....

मला एक प्रश्न सोलिड पडतो कि किती वर्ष भारत हेच करणारे कि आमच्या वंशाचा माणूस इथे गेला आणि तिथे गेला.... का असा कधी होत नाही कि एक सुनिता देशपांडे किवां सुनिता विल्यम्स हि भारतात जन्माला येते आणि भले अमेरिके तर्फे अंतराळात जाते.... बस एक राकेश शर्मा होता आणि त्या नंतर कल्पना चावला होती.......... राकेश शर्मा गेला होता १९८४ मध्ये आणि कल्पना चावला २००३ मध्ये जेव्हा तिचे निधन झाले....

मला इतकाच म्हणायचं कि करोडो लोकसंख्या असलेला ह्या देशातून १९८४ - २०१२ पर्यंत फक्त २ च अंतराळ वीर जावे आणि मग आपल्याला आपल्या "वंशाचा" "अंश" शोधावा लागावा. आणि त्या वर खुश रहाव लागावे..
म्हणजे इथे पण शिवाजी जन्मावा पण बाजुच्याच्या घरात.. आम्ही फक्त हा शिवाजी हा आमचा शेजारी होता म्हणून मिरवत रहावं

मृणालताई गोरे.






मृणालताई गोरे.
एक झंजार समाजवादी नेत्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे "पाणीवाली बाई". कारण त्यांचे कर्तुत्वच तसे होते.
एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अखं आयुष्य गोरगरीब जनतेला पाणी , रेशन , घर मिळावे यासाठी घालवलं. मग का पाणीवाली बाई हे नाव नाही मिळणार...
अश्या व्यक्तिमत्वाचा १६ जुलै २०१२ निधन झाले.... त्यांच्या कर्तुत्व मुळेच कि काय , पोलिसांनी दिलेल्या सलामीनंतर राष्ट्रध्वजाने आच्छादलेले मृणालताईंचे पार्थिव सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आले .

आज त्यांच्या अखेरच्या प्रवासाबद्दल वाचलं आणि डोक्यात अचानक विचार आला..... मृणालताई गोरे गेल्यात आणि त्यांनी जाताना अजून एक पाणी प्रश्न सोडवून गेल्यात.... तुम्ही निरीक्षण केलत मुंबई आणि इतरत्र १८ जुलै पासून जोरात पाउस चालू झाला...
त्यांनी स्वर्गात गेल्या गेल्या आपल्या माणसांचा पाण्याचा प्रश्न सोडवला..... आशी माणसं पुन्हा होणे नाही.. एखाद्या वेळेस राजेश खांना पुन्हा जन्माला येईल हो पण मृणालताई गोरे नाही येऊ शकणार.....

अश्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी श्रद्धांजली वाहतो... देव त्यांच्या आताम्याला शांती देवो आणि त्या परत जन्म घेऊन भारतातच येवोत.....

-आलेख पाटणकर

मी इथे हे हि मान्य करतो कि त्यांच्या कर्तुत्व बद्दल मी हि पूर्णपणे अज्ञानी आहे. तरी हि जे मनात होतं ते बोलतोय...

Sunday, July 8, 2012

तुझ्या आईची शपथ

आजचा एकदम मस्त स्टेटस

आज सकाळी डोक्यात असाच लहानपणीचा आणि आताच्या आयुष्याचा विचार आणि Comparison (तुलना) चालू होतं ... आणि एक मजेशीर गोष्ट लक्ष्यात आली..

आपण लहान होतो तेव्हा म्हणायचो "तुझ्या आईची शपथ". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी खोटी आशा... : )
मग आपण थोडे मोठे झालो आणि वाटलं आईची शपथ ने काही चालत नाहीये मग आपण बोलायला लागलो "तुझ्या आई रक्ताची शपथ". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी अजून खोटी आशा... : )
मग आपण अजून म्हणजे जास्त अक्कल असल्याच्या वयात आलो आणि
मग आपण बोलायला लागलो "तुझ्या आईची _____". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी अजून खोटी आशा... : )

मग काय बदल झाला.. आपल्यात, आपल्या विचारात, समोरच्या माणसात कि परीस्थितीत...

एक मित्र


आजचा मोठा पण खरचं वाचण्या सारखा स्टेटस....

बरयाचदा आपण एखाद्या निष्कर्षावर फ़ार लवकर पोहचतो.. एखादि गोष्ट घडते आणि आपण त्यातुन वेगळाच अर्थ काढतो आणी जेव्हा आपल्याला खंर कारण कळतं तेव्हा आपल्याला आपलीच लाज वाटते...
त्या दिवशी माझ्या बरोबर पण असंच घडलं.
मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितल मि भेटायला येतो.. तो म्हणाले ये मि वाट पहतोय... मि निघताना परत त्याला फोन केला आणि तो हि म्हणाली "ये मि आहे घरी"..
मि घरी पोहचलो तर मला कळंल कि तो बाहेर त्याच्या मित्राकडे गेलाय. माझा राग अनावर झाला... कि ह्याला आधि का नाही सांगता आलं... आणि मि "ठिक आहे" म्हणुन निघालो.. मनात राग होताच...
मग तो थोड्या वेळाने मला भेटायला आला.. मि म्हणालो..
"अरे भेटायचं नव्हत तर सांगायच ना यार"
त्या वर तो म्हणाला...
" अरे तसं नाही रे माझ्या एका मित्राच्या बायकोचं मिसकँरेज झालं आणि तो तेव्हा घरी नव्हता... त्याचे आई वडिल पण नव्हते.. म्हणुन त्या मित्राने मला फोन केला आणि म्हणाला... प्प्लिज तिला डाँक्टर कडे घेउन जाशील का?
बस मित्रा मी पैसे घेउन तिला डाँक्टर कडे घेउन गेलो म्हणुन तुला भेटु नाही शकलो... माफ़ कर"

खर सांगु मलाच माझी लाज वाटली... पण त्यातुन मि दोन धडे शिकलो..
१. कधिच लगेच निष्कर्षा वर नका पोहचु.
२. आणि जिवाला जिव देणारे चांगले मित्र मला आहेत..

विक्रम वेताळ


आजचा एकदम कोड्यात टाकणारा स्टेटस:

आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही नाही मिळत. मग आपण खुश नाही तर दुखी होतो.. पण ह्या मध्ये मी एक निरीक्षण केलंय.. म्हणजे बघा हा..
एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली कि तुम्ही आधी हिरमुसता आणि मग मनाला समजावता कि नसेल आपल्या नशिबात... मग तुम्ही परत नेहमीच्या कामाला लागता... तुम्ही दुखी असता पण तेव्हा त्याच तीव्रता असते अवघे ५०%... मग एक दिवस तुम्हाला कळत कि कोणी तरी ३ रया व्यक्तीला तीच गोष्ट मिळते.. भले त्याने ३-४ वेळा प्रयत्न केला असेल त्या साठी.. त्या व्यक्तीचा आणि तुमचा काडी मात्र संबद्ध नसतो...
आणि तुम्ही परत दुखी होता... मात्र ह्या वेळी दुखी होण्याची तीव्रता असते १००%...
मग आता मला सांगा खरं दुख कसलं...
१. आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं?
२. दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?
३. कि आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं पण दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?

उत्तर द्या नाही तर मी चाललो

तिर्थ


आजचा मजेशिर स्टेटस...

आज घरी येताना बाजुला एक गाडी येउन उभी राहिली... मला सवय आहे गाड्यामागे लिहलेल वाचण्याची... म्हणुन मि त्या गाडीमागे लिहलेलं वाचलं...
गाडि मागे त्या ड्रायवरच्या मुलाचे नाव होतं... आणि ते नाव लिहलेलं "तिर्थ"...
नाव मला साँलिड आवडलं...
आणि अचानक डोक्यात आलं....

ज्यांना जास्त efforts न घेता मुलं होतं ते त्यांच्या मुलाचे नाव तिर्थ ठेवत असतील....
पण ज्यांना खुप efforts घेतल्यावर मुलं होत असेल ते काय नाव ठेवत असतील...

आणि डोक्यात आलं....


प्रयत्नांची शर्थ.... :)

एक मस्तिखोर आयुष्य


मि एका गोष्टिच निरिक्षण केलय... बघा खरच मजेशिर आहे....

एखादी व्याक्ती किती हि हुषार असली आणि तुम्ही त्या व्याक्तीला विचारलं कि
तुमच्या लहानपणा बद्दल काही तरी सांगा तर ति व्याक्ती नेहमी असं म्हणते. कि मि
लहान असताना खुप "ढ" होतो किंवा खुप मस्तीखोर होतो.. शाळेत हि मस्ती करायचो,
बाई अश्या ओरडायच्या, आम्हि असे त्रास द्यायचो... वैगरे वैगरे....

बघा करुन कधितरी निरिक्षण....

म्हणजे हे कंस झालं....एखादी व्याक्ती जशी जशी म्हातारी होत जाते तशी तशी ति
किति तरुण आहे हे दाखवायला लागते...

म्हणजे काय तर तुम्ही किति हि हुषार व्हा.. पण तुमचं मन नेहमी तुम्ही मस्ती
केलेले दिवस लक्षात ठेवत.. आणि नसेल केली मस्ती तर खोटं खोटं चित्र उभ करुन
तुम्ही सांगता...

मग जेव्हा तुमचं मन अस मस्ती करण्याच्या दिवसा कडे झुकतं तर तुम्हाला मुंल
होतात त्यांच्या मागे तुम्ही का लागता कि हुषार हो... बघा विचार करुन......

एक Cute स्टेटस.....


एक Cute स्टेटस.....
काल बऱ्याच दिवसांनी माझी भाची अस्मी घरी आली. मी घरी आलो कि हिची मस्ती चालू होते. अवघ्या ६ महिन्याची असल्यामुळे अजून बोलता पण येत नाही.... रात्री तिला कंटाळा आला म्हून मी आणि बायको तिला घेऊन फिरायला गेलो... घोडा, भूभू, म्याऊ, गाड्या दाखवणं चालूच होत आमचं...
तेवढ्यात रस्त्यात एक ब्युटी पार्लर आलं. तिला म्हंटलं इथे तुला यायचं पण इतक्यात नाही, काही कळत नसून सुधा गोड हसली.. आणि थोडे पुढे गेल्या वर म्हैस चक्क झोपली माझ्या खांद्यावर....
इतकं मस्त वाटत होत...
झालं मग आम्ही पण घरी येऊन झोपलो... आणि सकाळ झाली.... बायको आधी उठते.. सो तिनी जाऊन पाहिलं तर बाईसाहेब उठल्याच होत्या.... मग बायकोने तिला उचललं आणि म्हणाली "चला आपण आता जाऊ मामा ला उठवायला"
आणि हि पण बाया आली मला उठवायला... जसं काही हिला कोणी पगाराच देणार आहे ह्या कामाचा....
मी गाढ झोपलेलो तेवढ्यात माझ्या गालावर इवलेसे मउ मउ हात फिरायला लागले आणि मी उठलो... तर हि बया समोर... हसत होती...
मी तिला इतकाच म्हणालो " बाई ग मी तुला रात्री झोपवलं आणि तूच मला उठवलस"

त्या वर पण एक गोड हसू आला तिच्या तोंडावर..... :)

फ़ायनल डेस्टिनेशन


आजचा मोठा पण प्लीज प्लीज वाचण्या सारखा स्टेटस..
माझ्या मित्र परिवार पैकी बरयाच जणांनी आजचा मुंबई मिरर वाचला असेल. नसेल तर नक्की वाचा.. एकदम पाहिलं पान.
समीर पवार नावाच्या एका २४ वर्ष्याच्या मुलाची बातमी आहे.... बातमी मध्ये एक माणूस आहे ज्याने घटना प्रत्यक्षदर्शी पहिली...
तो माणूस परवा हाय वे वरतून जात होता. खेरवाडी येथे त्याला त्याच्या बाईक च्या आरश्यातून ३०-४० बाईक जोरात येताना दिसल्या.. म्हणून त्याने स्वताची बाईक बाजूला घेतली.. आणि पाहिलं तर एकाने हि हेल्मेट घातलं नव्हतं आणि सर्व बाईक जवळ जवळ १०० किमी स्पीड च्या वर होत्या. म्हणून ह्याने विचार केला आपण पाठलाग करावा ह्यांच्या.. म्हणून त्याने पाठलाग केला आणि पाठलाग चालू झाल्या झाल्या ५ मिनिटाला.. त्यातली एक बाईक समोरच्या झाडावर जाऊन आपटली. ड्रायवर जवळ जवळ ५० मीटर लांब उडाला..
थोड्याच वेळात त्याच्या उरलेल्या बाईक वाल्या मित्रांनी त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत तो ड्रायवर गेला होता.... जो गेला त्याच मुलाचे नाव समीर पवार होते.
हे वाचून जर तुम्हाला धक्का बसला असेल तर खरा धक्का पुढे आहे.
त्याचे वय अवघे २४ होते. लग्न होऊन ५ महिने झालेले ते पण love marriage . घरच्यांचा लग्नाला विरोध होता आणि त्याहून वाईट म्हणजे त्याच्या बायकोच्या पोटात ३ महिन्याचा बाळ आहे....

त्या बातमीच्या शेवटला त्या मुलीच्या भावाला मिडीयाने विचारलं... तर तो बस इतकच म्हणाला now who is going to take care of her?

खरच विचार करा... तुमच्या हि नात्यात जर कोणी असेल रेस खेळत तर प्लीज त्याला सांगा... तू मारशील आणि तुझ्या पूर्ण घराला मारून जाशील....

टक्के कि टोमणे


आजचा अतिशय सुरेख स्टेटस

कोणी त्यांच्या मुलांचे किवा स्वताच्या लहानपणीचे result फेसबुक वर टाकलेत कि माझ्याच "फेस"लाच "फेस" येतो...
फेसबुक वर टाकलेल्या फोटो खाली लिहलं असता मला किवा माझ्या मुलाला इतक्या इतक्या इयत्तेत ९७/९८/९९ किवा कधी कधी १०० टक्के मिळालेत.... मग मला माझे लहानपाणीचे दिवस आठवतात... माझ्या शिक्षणाचा "आलेख" फारसा काही ठीक नव्हता...

९७/९८/९९ किवा कधी कधी १०० टक्के पाहिलेत कि आठवतं माझ्या पहिल्या इयत्ते पासून दहावी इयत्तेच्या टक्क्यांची तुम्ही टोटल जरी केलीत ना तरी ९७/९८/९९ किवा १०० टक्के भरणार नाही :D

कारण मला आठवतंय माझे बाबा पुलंचे चाहते होते. त्यांच्या वाचनात एकदा पुलंचा लेख आला, आणि त्यातला एक वाक्य ते मला बऱ्याचदा सांगायचे ते म्हणजे
"परीक्षेत मिळालेल्या टक्क्यांनपेक्ष्या आयुष्यात पुढे मिळणारे टक्के टोमणे जास्त महत्वाचे आहेत...."

मराठी भाषेची मजाच काही और आहे... जशी वळवाल तशी वळंते.....
त्याचा झालं हे. परवा माझ्या एका मित्राची होणारी भावी बायको त्याला भेटायला आली. ती येणार म्हणून त्याने मस्त पैकी तिच्यासाठी जेवण बनवलं.... आणि थोड्यावेळाने तो आमच्या घरी मला भेटायला आला.. बोलता बोलता तो मला म्हणाला
"काय रे तू कधी बनवल्यस का नेहा साठी जेवण" (नेहा म्हणजे माझी बायको)
आणि मग तो थोड्यावेळाने गेला...

माझी बायको मस्करीत म्हणाली "जेव्हा मी भेटायला आलेली तेव्हा तू काही बनवलस का माझ्यासाठी ?"
मी तिच्या कडे पाहिलं आणि म्हणालो.... " अगं मी तुलाच बनवलं"

(बनवलं म्हणजे फसवलं असा अर्थ होतो इथे. म्हणून ती इतकी छान मुलीचा माझ्याशी लग्न होऊ शकलं...... :) )

डोळॆ भाग ३


आजचा वाचण्या सारखा स्टेटस...

माझ्या बरयाच स्टेटस मध्ये मी सांगतो कि डोळे दान करा...... माझ्या आयुष्यात असे ३ अनुभव घडले कि ते पाहून मला तुम्हाला सांगावसं वाटलं.. मी एक एक करून ते तुमच्या पुढे मांडीनच.

पहिला अनुभव....
मी एकदा जोगेश्वरी स्टेशन वरून घरी जात होतो... एका बेंचवर एक आंधळी बाई बसलेली. तिच्या उजव्या बाजूला एक भैया बसलेला.. अर्थात ते दोघ आणि मी,असे तिघाही ट्रेन ची वाट पहात होतो.. ट्रेन येई पर्यंत काय टाईमपास करावा हे त्या भैयाला सुचत नव्हतं... तितक्यात त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. त्याने काय केलं.... तर त्याने त्या बाईच्या खांद्याच्या मागून आपला हात नेला. आणि तिच्या डाव्या खांद्यावर २-३ चापट्या मारल्या आपण कोणालातरी बोलावताना कसे बोलावते तसे...
ती बाई आंधळी असल्या मुळे तिला वाटलं मागून कोणी तरी बोलावताय.... ती कौन है कौन है म्हणून विचारायला लागली...
ह्याला त्यात काय मजा वाटली माहित नाही, ह्याने थोड्यावेळाने परत तेच केलं.... परत ती तेच म्हणाली कौन है कौन है... हे असा १० मिनिट चालू होता....

आता खरच विचार करा...... माझ्या सारख्या डोळे असलेल्या हे सर्व पाहून इतका त्रास झाला तर ज्यांना डोळे नाही आहेत त्यांना किती त्रास होत असेल....

खरच डोळे दान करा........
अगदीच नाही तर हा स्टेटस तरी शेअर करा

-आलेख पाटणकर

डॊळॆ भाग २


आजचा वाचण्या सारखा स्टेटस...
मागच्याच आठवड्यात मी तुम्हाला एक अनुभव सांगितला जो एका आंधळ्या बाई सोबत माझ्या समोर घडलेला .. आज मी माझ्या आयुष्यात घडलेला दुसरा अनुभव सांगणार आहे....
२-३ वर्षा पूर्वी मी एका दुकानात काही तरी घ्यायला गेलेलो.... काही तरी ५ रुपयाची वस्तू घेतली आणि मी १० रुपये दिले... अर्थात मला ५ रुपये परत येणार हे साहजिक आहे... दुकानदाराने मला हातात उरलेले पैसे दिलेत .
तुम्हाला माहीतच असेल भारतात मिळणारे ५ रुपयाचे नाणे जरा जाडीला जास्त असते ... तसच ते पण होत, मी मिळालेले पैसे नं बघता हाताने त्या नाण्याची जाडी चाचपून ते नाणं जीन्स च्या वरच्या खिश्यात म्हणजे जिथे आपण सुट्टे ठेवतो ना तिथे ठेवायला गेलो.. तेवढ्यात हाताला काही तरी घसरलेल जाणवलं.. म्हणून नीट पाहिलं तर फेविक्विक ने २ एक रुपयाची नाणी एकमेकांना चिकटवलेली... म्हणजे २ रुपये वापरून ५ रुपयाच नाणं बनवायचा आणि त्यावर ३ रुपये फायदा करून घायचा....
मी त्याला ते परत दिलं तर म्हणाला माफ करा सर चुकून झालं...


मग मनात विचार आला डोळे असणारया माणसाला असं फसवलं जाऊ शकत तर जो माणूस अशी नाणी चाचपडून बघतो तो किती फसत असेल...


कृपया नक्की शेअर करा.....

-आलेख पाटणकर

सत्यमेव जयते

कालचा सत्यमेव जयतेचा एपिसोड मस्तच होता...
कारण कालचा रडारडी पेक्ष्या आयुष्याकडे कसे positively बघता येऊ शकत ह्या बद्दल होता...

तरी पण मला आपल्या भारतीयांचा फार नवल वाटतं. ते ह्या साठी कि एखादा माणूस तुम्हाला रस्त्यात भेटला आणि आयुष्यात काही शिकवून जाणारं काही बोलला तर आपण त्या माणसाला अतिशहाणा समजतो पण जेव्हा त्याच माणसाच्या आयुष्याशी निगडीत काही वाईट घडलेला असत आणि त्या वाईटाशी तो लढत असतो आणि तेव्हा त्याच माणसाने तेच आपल्याला सांगितला तर मात्र ते आपल्याला ब्राम्हदयान वाटत....

मी माझ्या गेल्या ३ पोस्ट मध्ये आंधळ्यांचा दुख सांगितलेला बस तेच काल अमीर खान ने सांगितले.... आता तरी तुमचे डोळे दान करा

माझी ४ ओळी.......


ना ईतिहासात ना चौथरयावर जागा
हिच खंत त्या वाघ्याची
सर्व तोडून गेले तरी आमची
भुमिका मात्र बघ्याची

=======================================================
.
जिथे स्वताःवरचा विश्वास उडतो
तिथे येऊन प्रयत्न हि रडतात
आणि नेमकं तेव्हाच माणसं
देवाचं दगडाशी नात जोडतात

========================================================
.
पाणी म्हणजे नक्की काय
पाणी म्हणजे जीवन
मग त्यात दारू मिसळली
कि मात्र बनतो हा प्रश्न गहन
=========================================================
प्रत्येकासाठी मॄत्यु तर अटळ आहे..
काळ फ़क्त उरलेले दिवस मोजतो.
मृत्युची आणी आपली वाटच वेगळी
असल्याच्या आर्विभावात ईथे प्रत्येक जण निजतो.
========================================================
.
तिच्या आणि त्याच्या
अनेक भेटी घडल्या
विरहा नंतर त्यांना
त्यांच्या भेटीच नडल्या
======================================================
.
ऑडी,मर्सि,बीएमडब्लू
गाड्या धावतात हफ्त्यावर
गाडीत मिळाला कचरा
कि तो टाक मात्र रस्त्यावर
===========================================================
.
दुख: हेच जर
व्यसनाचे कारण आहे.........
तर त्याचा परिणाम
मात्र मरण आहे..
===========================================================
.
समईतली ज्योत
वाऱ्याबरोबर नाचत होती
उरलेली वात मात्र
जळालेला आयुष्य वाचत होती 
===========================================================
खालील ४ ओळी संपूर्णपणे काल्पनिक आहे.. त्याचा माझ्या आयुष्याशी काही संबद्ध दिसला तर तो एक निवळ योगायोग समजावा...

बाईक चालवताना रीक्ष्यातल्या
मुलीना बघण्याचा हव्यास
कळत का नाही इतकं साधं
जान बची तो लडकीया पच्हास 
===========================================================
झाडाची सरळ फांदी सुधा
लोक्काना वाकडी भासते
ह्यात फांदीचा काय दोष
इथे नजरच वाकडी असते
===========================================================
.
मीटर सक्ती केली म्हणून
बंद झाल्या रिक्षा
मीटर लावताना सुधा
सामान्यांनाच शिक्षा ?
===========================================================
तुला डावलून पुढे जाऊ शकेन
तो दिवस खरा
पण मला वाटतं त्यातही
माझं सोंग असेल जरा
- Chandrashekhar Gokhale

माझा फ़ुकटचा प्रयत्न...

तुला डावलुन पढे जाण्यात
बहुदा माझ सोंग असेल पुर्ण
त्या पेक्षा मला परवडेल
तुझ्या समोर हरण....
- पाटणकरांचा आलेख

===========================================================
हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो
मनावरचा घाव
दाबून धरावा लागतो....
- Chandrashekhar Gokhale
.
हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो
दुख असले तरी हसीन
ह्या शब्दाला मी जागतो
- आलेख पाटणकर
===========================================================

===========================================================
===========================================================
===========================================================

डोळे आणि पावसाळी ढग

डोळे आणि पावसाळी ढग यात एक साम्य आहे... दोघांनमधून भरून आल्यावरच पाणी येतं..
-आलेख पाटणकर

Friday, July 6, 2012

डोळॆ.....






आजचा खरच वाचण्या सारखा स्टेटस....एकदा प्लीज वाचा


काल आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला २ गोष्टी सांगितल्या आंधळ्या लोकांच्या . आज मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगणार आहे जी मी अनुभवली आहे... मनापासून वाचा कारण जरा हृदयद्रावक आहे...


मी काही वर्षापूर्वी बोरीवली स्टेशन वरून घरी येत होतो. पुढून एक आंधळा माणूस चाललेला. platform च्या एकदम बाहेरून तो चालत होता. आजूबाजूने कुठली ट्रेन येत नव्हती. पण कोणी त्याच्या मदतीला जाऊन त्याला बाजूला खेचायला हि तयार नव्हतं.
मी पुढे जाऊन त्याला बाजूला केलं.. उगाच तेवढ्यात ट्रेन येऊन त्याला काही होऊ नये म्हणून...
तो म्हणाला "मना पासून धन्यवाद"
platform संपायला वेळ होता म्हणून मी त्याच्याशी बोलू लागलो. त्याला म्हणालो तुम्ही गाडी जिथून जाते त्याच्या अगदी जवळ होता काही झालं असतं तर... आणि कोणी तुमच्या मदतीला पण येत नाहीये.

त्या वर त्याने मला एक त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगितली...
तो म्हणाला " साहेब लोकांच्या मदतीची तर आम्ही आंधळी लोक कधीच अपेक्षा नाही करत. तुम्ही आलात हेच खूप आहे.. मी एकदा असाच चालत चालत स्टेशन वून खाली उतरून रुळावर गेलो.... समोरून एक ट्रेन येत होती. पण एका हि जण मला बाजूला करायला नाही आला... तेवढ्यात ट्रेन च्या ड्रायवर ने होर्न वाजवला म्हणून मला कळलं. नाही तर आज आपण भेटलोच नसतो. आता मला ट्रेन ची भीती नाही वाटत साहेब "

त्या वेळी मला माझाच अभिमान वाटत होतों कारण मी त्याला मदत केली होती आणि माणूस असल्याची लाज पण.......


मित्रानो खरच डोळे दान करा.....

खरच हा स्टेटस शेअर करा....

-आलेख पाटणकर

काकस्पर्ष


सध्या मी एका गोष्टीचा फार निरीक्षण केलंय आणि ते म्हणजे तुम्ही एक पाहिलंय का आज काळ कावळे फार खालून उडतात.. कधी कधी तर चालणारयांच्या आंगावर पण झेपावतात...

हायवेवर पहाल तर बरेच कावळे गाडी खाली येऊन मरून पडलेले दिसतील.. कळत नाही का ते... आधी नव्हतं असं...

कालच एका कावळ्याने मला प्रसाद दिलाय.... थोड्या आठवड्यापूर्वी माझ्या सासू ला मग माझ्या आईला आणि काल मला मिळालाय प्रसाद....

सासरे तर सांगत होते कि आपण कावळे शांती करून घेऊ :D

पण माझ्या मते कावळ्यांनी बहुदा काकस्पर्ष जरा जास्तच मनावर घेतलाय :D

आता सचिन खेडेकर सारखा मला विचारावस वाटत का का का ?

प्यार हुआ इकरार हुआ ही, प्यार से फिर क्यू डरता है दिल..


प्यार इश्क और मोहब्बत ह्या वर बरीच गाणी आपल्याला bollywood ने दिलीत.. प्रत्येक गाण्यात प्रेम काय आहे हे सांगण्याचा जोरदार प्रयत्न झाला...

पण एक गाण असं होऊन गेलं ज्याने खरं प्रेम कसे आहे हे दाखवून दिलं...
आणि ते गाण आहे....

प्यार हुआ इकरार हुआ ही, प्यार से फिर क्यू डरता है दिल..
डरता है दिल रस्ता मुश्कील. मालूम नही है कहा मंजिल......


ह्या गाण्यातला सगळ्यात हृदयाला भिडणारी लाईन म्हणजे
"डरता है दिल रस्ता मुश्कील. मालूम नही है कहा मंजिल......"

त्या मुळे प्रेमात पडताना एकदा हे गाणं नक्की ऐका....



- आलेख पाटणकर

वड्याचे तेल वांग्यावर





एकदा जरूर वाचा....
लहानपणी मला माझ्या बाबांनी खूप गोष्टी शिकवल्या.. त्यातली हि एक गोष्ट...

ते नेहमी म्हणायचे.. कधी हि वड्याचे तेल वांग्यावर काढू नका... कारण जर तुम्ही तसं केलत तर तेल तडतडतं आणि वांग्याची वाट लावतं.
ह्याचा अर्थ असा तुमच्या मनात जर कुठल्या दुसरया गोष्टीचा राग असेल तर तो त्या गोष्टीवर काढा पण कधी हि दुसरया गोष्टीवर काढू नका...

माणसाच्या मनात नेहमी water tight compartment असलं पाहिजे...

म्हणजे असं compartment जिथे पाणी साचवून ठेवलं तर ते दुसरया compartment मध्ये कधीच नाही गेलं पाहिजे.
आज मी हि गोष्ट माझ्या नेहमीच्या वागण्यात आणण्याचा खूप प्रयत्न करतो.... त्याने राग कमी पण होतो आणि नाती पण नीट राहतात....

तुम्ही हि आमलात आणा आणि तुमच्या मुलांनाही शिकवा.... खूप फायदा होतो ह्याचा....

-आलेख पाटणकर

एका मनाचं दुखः



नक्की वाचण्या सारखा स्टेटस....

सोनिया(अर्थात नाव बदलेलं आहे). माझ्या बायकोच्या कंपनी मध्ये काम करणारी एक मुलगी. आई वडील तिच्या लहानपणीच विभक्त झालेले. विभक्त झाल्यावर मुलीला तिच्या मामा कडे सोपवून दोघं कुठे गेलेत ते आजतागायत कोणालाही माहित नाही... म्हणजे इतक माहित नाही कि जिवंत आहेत कि नाही हे पण माहित नाही.
मुलीला कधी contact करायचा पण प्रयत्न केला नाही... तेव्हा पासून हि मुलगी मामा कडे राहतेय.
आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन... मी हि असच मनात म्हटलं जेव्हा माझ्या बायकोने तिच्या बद्दल मला सांगितला..
तर आज ती मुलगी ३३ वर्ष्याची आहे.. लग्न नाही झालय. मधल्या काळात काळजी घेणाऱ्या मामा ला अर्धांगवायू म्हणजे प्यारीलीसीस ने गाठलं इतकं कि मामा बेड वरून उठू शकत नाही.. स्वतःच स्वतः जेवू शकत नाही.
आज ती मुलगी सकाळी ५ ला उठते जेवण बनवते मामा ला भरवते मग ऑफिस ला पळते तिथे कामं आटपून घरी धावत येते परत जेवण बनवते मामाला भरवते. त्याचे जे काही विधी आहेत म्हणजे toilet batharoom ते सगळा स्वतः करते.. मधल्या ९ तासाच्या Duty मध्ये मामा उपाशीच असतो
एक माणूस ठेवलेला पण तो निघून गेला तेव्हा पासून हिलाच करावं लागतंय. त्यात मामा पुरुष आणि हि स्त्री पडतेय.. म्हणजे ह्या सर्व कामात एक अडचण हि येणारच पण त्याचा हि विचार न करता हि मुलगी हे सर्व करतेय...
मामाच स्वतःचा म्हणन आहे कि त्याला वृद्धाश्रमात ठेवा त्याला भाचीचे हाल बघवत नाहीयेत.... त्या वर तिच्या शेजार्च्यांचा म्हणणं आहे.. हिलाच मामा नकोय म्हणून पाठवतेय...

आता तिला एक प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे तिचा लग्न होईल का ह्या जन्मात.... ह्या सर्व रगडगाण्यात तिला कोणाची साथ मिळेल का?

आता विचार करा इतके सारे प्रोब्लेम असून ती मुलगी एकटी निभावतेय... आणि आपण....

आपल्या आयुष्यात थोडं कोणी पादलं कि आपण घाबरतो....

मी वर सांगितल्या मध्ये सोनिया च्या जागी जर प्रियांका चोप्रा असती आणि मामाच्या जागी जर बोमन इराणी असता तर तुम्ही ३०० रुपये टाकून तो चित्रपट पाहायला जाल... आणि बाहेर येऊन म्हणाल काय दम आहे पोरी मध्ये.... पण अश्या प्रियांका चोप्रा आपल्या मधेच वावरतायत

-आलेख पाटणकर

रसवंती गृह

आजचा वाचण्या सारखा स्टेटस.....

परवा एका रसवंती गृहात गेलेलो म्हणजे ज्यूस सेंटर हो.... गेल्या गेल्या उसाचा रस मागवला....
जसा रस मागवला तसं उसाचा रस काढायचा मशीन चालू झालं.. रस काढणारयाने....... छान असे उस निवडून काढले आणि टाकले मशीन मध्ये. येऊ लागला रस त्यातून... परत तेच उस वापरून त्याने त्याउन अजून बराच रस काढला.... आता जेव्हा रस यायचा बंद झालं तेव्हा मात्र त्याने तो चोथा फेकून दिला....

आता तुम्ही म्हणाल आम्ही प्यायलोय रे बाबा ... कशाला सांगतोयेस.....

पण जेव्हा हि वरील किर्या चालू होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालू होते.... माणसाच्या आयुष्यात आणि त्या उसाच्या रसात काय फरक आहे हो...
माणूस लहान असतो तेव्हा त्याच्या कडून काही जास्त अपेक्षा नसतात .. जसा उस कोवळा असेल तर त्याला घेत नाही रस काढण्या साठी तसेच...
माणूस तरुण होतो तसं त्याचा वापर जास्त होतो सेम उसा सारखं....
जेव्हा त्याचा वापर संपतो तेव्हा रस संपलेल्या उसा सारखा त्याचा हि चोथा होतो...... आणि मग सुरु होते ते dustbin शोधण्याची प्रोसेस..... जिथे त्याला टाकता येईल.
ज्याला आजच्या भाषेत वृद्धाश्रम म्हणून पण म्हणतात......

- आलेख पाटणकर

विजयी विश्व तिरंगा प्यारा.....


प्लीज नक्की वाचा....
आजचा पेपर उघडला आणि पाहिलं तर सगळी कडे एकच बातमी. "मंत्रालयाला आग लागली" म्हणून.... तसं बातमी वाचायची ईछा नव्हती. .. पण एका बातमी ने माझं लक्ष खेचून घेतलं... आणि मला अभिमान वाटल्या त्या लोकांचा..
बातमी होती...
जेव्हा मंत्रालयाला आग लागली तेव्हा काही लोग धावत खाली येत होते. आपले मंत्री तर मंत्रालयात नव्हतेच.
तुम्हाला माहितीच असेल आपल्या मंत्रालयावर आपला राष्ट्रध्वज आहे.... तर राष्ट्रध्वज ज्या बिल्डींगवर असतो त्याना एक नियम असतो तो म्हणजे राष्ट्रध्वज हा नेहमी सूर्यास्त नंतर खाली उतरवला जातो...

आता ह्या सर्व घाई गडबडीत राष्ट्रध्वजला कोण लक्ष्यात ठेवणार हो.....

पण मंत्रालयावर दररोज सकाळी राष्ट्रध्वज फडकवणे व सूर्यास्तानंतर तो उतरवून ठेवणे हे काम करणारे कर्मचारी मंत्रालयाला आग लागताच झेंडा वाचवण्याकरिता सहाव्या मजल्यावरील चबुतऱ्यावर चढून उभे राहिले . त्यांच्यासोबत भयभीत झालेले काही कर्मचारीही होते . आगीची तीव्रता वाढताच सूर्यास्तापूर्वीच राष्ट्रध्वज उतरवून हे कर्मचारी स्नॉर्केलच्या सहाय्याने खाली उतरले .

मंत्रालयाच्या सहाव्या व सातव्या मजल्यावर आग पसरली तेव्हा मंत्रालयावरील राष्ट्रध्वजाशेजारी पाच - सहा कर्मचारी उभे होते . खालून हे दृष्य पाहणाऱ्यांना हे कर्मचारी अडकल्याचे व संकटात असल्याचे जाणवत होते . मात्र आगीची तीव्रता पाहून त्यांनी ध्वज उतरवला व त्यानंतर हे कर्मचारी स्नॉर्केलच्या सहाय्याने खाली उतरले .

ह्या लोकांनी हि आगच लावली कि हो.. पण आजच्या माझ्या सारख्या तरुण पिढीच्या हृदयात आणि ती पण अभिमानाची.....

hats off .......

तुमच्या साठी मी इथे फोटो शेअर करत आहे......

प्लीज प्लीज प्लीज हा स्टेटस शेअर करा

-आलेख पाटणकर


Thank you

खरच वाचण्यासारखा स्टेटस....

"वेटर जरा एक डोसा आण"," अरे हि फाईल तिथे ठेव","अरे जरा गेट लाव"..
ह्या आणि अश्या बरयाच वाक्यात तुम्हाला काही तरी मिसिंग वाटतय... नसेल वाटत... कारण आपल्याला सवयच नाहीये ना....

तर ह्या सर्व वाक्याच्या शेवटी २ शब्द मिसिंग आहेत. आणि ते म्हणजे Thank you .....

साधे २ शब्द पण आपले काम करणारयाला खूप बरं वाटून जातात...

त्या दिवशी मी ऑफिस मध्ये जेवायला बसत होतो.. ज्या टेबलावर बसत होतो तिथे आधीच्याने थोडं जेवण पाडून ठेवलेलं.. मी टेबल पुसाणारयाला बोलावलं आणि म्हंटल "प्लीज हे टेबल पुसता" तो हो म्हणाला आणि पुसायचा म्हणून पुसून वळला .... मी त्यांना परत हाक मारली... त्याला वाटलं नीट पूस सांगायला बोलावतोय....
तो म्हणाला "काय आहे.. "
मी म्हणालो "Thank you sir" आणि हसलो...
तो म्हणाला माफ करा साहेब आणि त्याने नीट टेबल पुसून दिलं आणि हसून गेला....

खरच मित्रानो. एक thank you बोलायला पण आणि ऐकायला पण खूप छान वाटत......
तुम्ही हि प्रत्येक छोट्या गोष्टी साठी thank you बोला..... सामोरच्याच्या मनात तुमच्या बद्दल आणि तुमच्या मनात तुमच्या बद्दल आदर तयार होतो.....

आणि हो हा स्टेटस पूर्ण वाचल्या बद्दल " thank you "

आलेख पाटणकर

माझी गुरुपोर्णिमा...

आजचा नक्की वाचण्या सारखा स्टेटस....

परवाच्या गुरुपौर्णिमेच्या धरती वरचा माझा दुसरा स्टेटस....

गुरु किवा शिक्षक काय असतो ह्याचा खरं तर आपण अंदाज पण नाही लावू शकत.... मी ४थि मध्ये असताना म्हणजे १९ वर्षा पूर्वी आम्हाला एक शिक्षिका होत्या पवार बाई नावाच्या... त्या एकदा म्हणजे ३ वर्षा पूर्वी मला बँकेत भेटल्या. माझी ४थि होऊन १६ वर्षांनी.

मी नेहमी प्रमाणे counter वर उभा होतो त्या मागे एका सोफ्यावर बसलेल्या.. मी त्यांना पाहिलं पण मनात एक नुन्यगंड होता कि ह्या आपल्याला नक्कीच ओळखणार नाही. आणि का ओळखतील मी त्या वेळी इतका हुशार हि नव्हतो हा पण मस्तीखोर होतो :).....
त्यांनीहि पाहिलं आणि त्यांना अंदाज आला असावा कि माझ्या मनात काय चाललंय....

त्या उठून माझ्या कडे आल्या आणि मला म्हणाल्या "मी चुकत नसीन तर तू गोखले शाळेत होतास?"
मी म्हणालो हो बाई.. तुम्ही पवार बाई ना? माझा नाव ........"
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाल्या तुझं आडनाव पाटणकर आहे ना...?
माझ्या कडे लाजे शिवाय काही नव्हतं...
मी "हो" म्हणालो ......
त्यांनी परत मला मधेच थांबवून म्हणाल्या "तुझं नाव काही तर वेगळा आहे ना म्हणजे इतरां पेक्षा वेगळं.... आणि मी जर परत चुकत नसीन तर तुझं नाव आलेख आहे ना?"
त्या क्षणी कोणी तरी आपल्या माणसाने आपल्याला ओळखावे आणि जवळ करावे असे भाव माझ्या मनात होते.....

आम्ही पुढचा अर्धा तास गप्पा मारल्यात.. ज्यात मला कोणी तरी आपुलकीने विचारात होता कि सध्या तू काय करतोस आणि खूप काही....

खरच धन्य ते शिक्षक आणि धन्य ती माझी शाळा "गोखले शाळा".....
- आलेख पाटणकर