Thursday, August 9, 2012

आजी,,,,,,,,,,,,,,,,,



परवा मी आजी बद्दल एक स्टेटस लिहिला आणि त्या वर खूप सारे लाईक आले आणि comments पण. त्या साठी आधी मना पासून धन्यवाद......
मी त्या पोस्ट वर एक पहिले, खूप ल
ोक्कांचा रिप्लाय आला कि आम्हाला आजी आजोबा नाहीयेत...

तर आज मी तुम्हाला अश्या एका आजीबद्दल सांगणारे जिचं माझ्याशी रक्ताचे किवा कौटुंबिक नाते नव्हते.... पण ती आजी होती..
त्या आजीचे नाव आहे मुणगेकर आजी... माझ्या मित्राची आजी ती .. आमच्याच शेजारी रहायच्या.... मला आज हि आठवतंय.. त्या मला आलेख एवजी अनिक नावाने हाक मारायच्यात....
उन्हाळ्यात त्यांच्या घरी गावा वरून आंबे यायचे.. आमच्या घरी आम्ही विकत आणायचो.... पण त्या आजी आमच्या साठी गपचूप पदरात लपवून ३-४ आंबे आणाच्यात... आणि मग बेल वाजवून म्हणायाच्यात "आनिक आहे का आनिक "... आणि मी आलो कि गपचूप माझ्या हातात ते ३-४ आंबे द्याच्यात.... जितके प्रेम त्यांचे त्यांच्या नातवांवर होते तितकेच प्रेम त्या आमच्या वर करायच्यात....

मग घरात एकदा कुकरची शिट्टी उडाली आणि त्या घटनेमुळे त्यांचा स्वतावरचा आत्माविश्वास पण गेला... मग काही वर्षांनी वयांमुळे त्या आजी पण गेल्या......
त्यांनतर बरीच वर्षे गेलीत.. बरेच उन्हाळेपण गेलेत..... आम्ही पण बर्याचदा आंबे आणलेत... पण त्या आजी ने देत असलेल्या आंब्यांची गोडी मी आणि माझा परिवार आज पण शोधत आहोत...

-आलेख पाटणकर

प्रेमाने फोन करायला किवां भेटायला तुम्हाला तुमचेच आजी आजोबा असले पाहिजेत हे गरजेचे नाही.....

हा फोटो त्या आजींचा नाहीये
 

एक क्यूट स्टेटस..


एक क्यूट स्टेटस.... नक्की वाचा 
आजी आजोबा एक फार छान गिफ्ट असतं तुमच्या आयुष्यातलं.... ते काही लोक्काना मिळतं तर काहीना नाही मिळत.. मला देवाने अर्धेच गिफ्ट दिले म्हणजे मला आजी आहे पण आजोबा नाहीत....

जरा तब्येतीच्या कुरबुरी मुळे काल तिला भ
ेटायला गेलो... दमलेली... ९० + झाले आहे तिचे..(touchwood ) पण मला आणि बायकोला पाहून खुश झाली.. सगळी दुखणी विसरली... ती तिची दुखणी वीसरावी म्हणून आम्ही उगाच तिला काही तरी विचारात असतो आणि ती पण उत्तर देत असते...
तिला ६ मुले (३मुली आणि ३मुलगे) त्यातला सगळ्यात तिचा आवडता जर कोणी असेल तर तो माझा सगळ्यात छोटा मामा 'मोहन मामा'....
निघताना मनात आलं हिची तब्येत बरी असेल ना? म्हणून मी तिला अजून एक प्रश्न विचारला...
"मग आजी आदित्य(माझा मामे भाऊ) आणि मोहन ला काही सांगायचं"
तिनी माझ्या कडे रागाने पाहिलं आणि म्हणाली" नेम ने काय बोलतोस"
मला काही समजले नाही मी म्हणालो "म्हणजे काय म्हणालीस"
ती पहातच होती, मला म्हणाली" मामा आहे तुझा"
हाहाहाहाहा मित्रानो मी जोरजोरात हसायलाच लागलो...... ती हि हसायला लागली आणि आम्ही सगळेच हसायला लागलो... आजी जर modern असल्या मुळे नावाने काय बोलावतोस च्या एवजी ती म्हणाली नेम ने काय बोलावतोस.....
मी sorry sorry म्हणून परत विचारलं "मोहन मामा ला काही सांगायचं का?"
तर म्हणाली "हा सांग कि मी खुशाल आहे" आणि तिनी माझा पापा घेतला

हा स्टेटस वाचून तुम्हाला तुमच्या आजी आजोबांची आठवण येत असेल तर प्लीज नक्की आज एक फोन करा.....

-आलेख पाटणकर

वरील फोटो माझ्या आजीचा आहे... @santosh prabhune ह्यांनी नाशिक ला एक आजी आजोबा फोटोग्राफी contest केलेली त्यात ह्या फोटो ला ३रे बक्षीस मिळालेलं

समाज एक घटक...


समाज हा वेगवेगळ्या घटकांनी बनलाय... काही घटक समाज बिघडवतात तर काही सुधरवतात किंवा कमीतकमी त्याला समांतर तरी ठेवायचा प्रयत्न करतात. पण माझे असे ठाम मतं आहे जेव्हा एक घटक समाज बिघडवत असतो तेव्हा दुसऱ्या घटकावर त
ो सुधरवण्याची जबाबदारी येते किंवा असं म्हणा कि तो समांतर ठेवणं हा त्या घटकाचा पोट्यापाण्याचा प्रश्न बनतो..
म्हणजे बघा हा.. जेव्हा एक घटक चोऱ्या,दरोडे,बालात्त्कार करत असतो तेव्हा त्यांना निट करायला पोलीस असतात... जेव्हा लोक रस्त्यावर पचापचा थुंकतात तेव्हा BMC एक घटक असा तयार करते कि तो ह्या लोक्काना पकडेल...
अर्थात हे घटक तयार करावे लागतात... पण काही घटक हे स्वताहून तयार होतात.. परंतु भारतात अजून असे हि काही समाज बिघडवणारे घटक आहेत कि ज्यांना सुधरवणारे घटक बनायचेत अजून...
तर हे सगळं सांगण्यामागे मी परवा घेतलेला अनुभव...

मी परवा बाईक ने जात होतो. माझ्या पुढून एक इनोवा जात होती. थोड्या वेळाने त्याची काच उघडली आणि आतून एक रिकामी बाटली फेकण्यात आली.. तर हा झाला समाज बिघडवणारा घटक... ते पाहून मला फार वाईट...
पण थोड्याच क्षणात एक बाई तिथल्याच फुटपाथ वरून उठली. तिच्या पाठीवर एक पोतं होतं... तिनी धावत जाऊन ती बाटली उचली आणि पोत्यात टाकली.तिच्या तोंडावर एक आनंद होता २ पैसे मिळाल्याचा.. आता हा झाला समाज समांतर ठेवणारा घटक...

आज आपला समाज जो काही समांतर आहे तो ह्या घटकां मुळेच... मी सलाम करतो अश्या घटकांना......

बात कुछ हजम नही हुई सर... हाजमोला सर


तुमची एखादी सवय तुम्हाला कधी गोत्यात आणेल हे सांगता येत नाही.. तुम्हाला कधी लाजवेल किंवा इम्बरेस करेल हे सांगता येत नाही...

माझ्या बरोबर घडलेला एक मजेशीर किस्सा सांगणार आहे..

मला टाईमपास करायला गोळ्या चघळायाची फार सवय आहे.. इतर व्यसना पेक्षा हे बरं....
आणि त्यातली आवडती गोळी म्हणजे हाजमोला.. एकदा असाच ऑफिस च्या लिफ्ट मध्ये शिरलो.. लिफ्टमध्ये जेमतेम ६ लोक असतील.. ३ मुली आणि मी धरून ३ मुले. लिफ्ट चालू झाली.. टाईमपास म्हणून मी खिश्यातून हाजमोलाचे पाकीट काढले आणि टपाटपा गोळ्या तोंडात टाकायला लागलो... तितक्यात काय झालं माहित नाही.. पण उरलेल्या मुलां पैकी कोणी तरी एकाने लिफ्ट ची हवा दुर्गंधीत केली.....
बसं पक्षी बसायला आणि फांदी तुटायला तो एक क्षण बस होता... लिफ्ट मधल्या सर्वे मुली आता माझ्या कडे पाहत होत्या.. कारण त्यावेळी मी मस्त हाजमोलाचे पाकीट पकडून उभा होतो....

आता तुम्ही हि माझ्या कडे त्या मुलीं सारखे पाहू नका :D

-आलेख पाटणकर
 

Friday, August 3, 2012

क्योंकी कि हर एक फ्रेंड जरुरी होता है....


आपल्याला बरेच मित्र मैत्रीण असतात.. मला हि आहेत.. पण कालांतराने सगळे बिझी होतात आणि मग कमी होतो तो एकमेकांमधला संवाद... मग कधी तरी खूप गरज वाटते एखाद्या मित्राची, वाटत सगळं सोडून त्याला भेटायला जावं थोडं बोलावं त्याच्याशी.... पण तो पर्यंत आपण ती संधी घालवून बसलेलो असतो. मग चालू होतो तो मनातला खेळ, कि काय करू मी, करू कि नको त्याला call ..
नको तो विसरला असेल. किवा कामात असेल.
बऱ्याचदा असे होते कि आपण आवर्जून मित्रांना फोन करतो ते पण तेवढ्याच पुर्त बोलतात.. मग दुसरा खेळ चालू होतो मनात कि ह्या वेळी मी केला फोन आता मित्र करेल मला आणि तसं कधीच होत नाही...
टाळी मित्रानो कधीच एका हाताने वाजत नाही... कधी तरी मित्राला स्वताहून फोन करा.. जर कोणी मित्र तुम्हाला फोन करत असेल तर कधी तरी त्याला तुम्ही फोन करा...

क्योंकी कि हर एक फ्रेंड जरुरी होता है....

समाज


समाज हा वेगवेगळ्या घटकांनी बनलाय... काही घटक समाज बिघडवतात तर काही सुधरवतात किंवा कमीतकमी त्याला समांतर तरी ठेवायचा प्रयत्न करतात. पण माझे असे ठाम मतं आहे जेव्हा एक घटक समाज बिघडवत असतो तेव्हा दुसऱ्या घटकावर तो सुधरवण्याची जबाबदारी येते किंवा असं म्हणा कि तो समांतर ठेवणं हा त्या घटकाचा पोट्यापाण्याचा प्रश्न बनतो..
म्हणजे बघा हा.. जेव्हा एक घटक चोऱ्या,दरोडे,बालात्त्कार करत असतो तेव्हा त्यांना निट करायला पोलीस असतात... जेव्हा लोक रस्त्यावर पचापचा थुंकतात तेव्हा BMC एक घटक असा तयार करते कि तो ह्या लोक्काना पकडेल...
अर्थात हे घटक तयार करावे लागतात... पण काही घटक हे स्वताहून तयार होतात.. परंतु भारतात अजून असे हि काही समाज बिघडवणारे घटक आहेत कि ज्यांना सुधरवणारे घटक बनायचेत अजून...
तर हे सगळं सांगण्यामागे मी परवा घेतलेला अनुभव...

मी परवा बाईक ने जात होतो. माझ्या पुढून एक इनोवा जात होती. थोड्या वेळाने त्याची काच उघडली आणि आतून एक रिकामी बाटली फेकण्यात आली.. तर हा झाला समाज बिघडवणारा घटक... ते पाहून मला फार वाईट...
पण थोड्याच क्षणात एक बाई तिथल्याच फुटपाथ वरून उठली. तिच्या पाठीवर एक पोतं होतं... तिनी धावत जाऊन ती बाटली उचली आणि पोत्यात टाकली.तिच्या तोंडावर एक आनंद होता २ पैसे मिळाल्याचा.. आता हा झाला समाज समांतर ठेवणारा घटक...

आज आपला समाज जो काही समांतर आहे तो ह्या घटकां मुळेच... मी सलाम करतो अश्या घटकांना......

-आलेख पाटणकर

मला ह्या स्टेटस वरून मला हे नाही सांगायचं कि दुसरा घटक आहे म्हणून कचरा टाका बिंदास...