Thursday, November 8, 2012

CTRL +ALT +DEL





काल कॉम्पुटर वापरताना एक विचार डोक्यात आला....

कॉम्पुटर आणि आयुष्यात एक साम्य आहे... कॉम्पुटर आणि आयुष्यात जेव्हा प्रोब्लेम येतात तेव्हा आपण लगेच ते CTRL +ALT +Del करून एंड टास्क करायला जातो... पण प्रोब्लेम थोड्या वेळाने परत येतो. 
त्या पेक्षा "wait for program to respond " वर आपण थांबलो तर प्रोब्लेम आपोआप पण सुटतो आणि लगेच परत येत नाही...

काय म्हणता....... पटलं तर लाईक करा

- आलेख पाटणकर

सिंधुताई





मागच्या आठवड्यात "हफ्ता बंद" मध्ये सिंधुताई सपकाळ आल्या. आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी इतक सुंदर उत्तर दिलं.. मी परत एकदा त्यांच्या प्रेमात पडलो.....
मकरंद ने त्यांना विचारलं कि "माई आता मुली शिकल्या स्वताच्या पायावर उभा राहिल्या.. तुम्हाला वाटत का हो त्या स्वतंत्र झाल्यात?"

आता हा प्रश्न तुम्हा आम्हाला विचारला असता तर आपण बोललो असतो.. हो आहेत ना पण 

त्या वर सिंधुताई म्हणाल्या " कसं आहे ना बाळा.. त्या मुली शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या पण राहिल्यात रे.... पण त्या आता हे विसरल्यात कि आपण का शिकलो.. आणि आपल्या शिक्षणाचा समाजाला कसा फायदा होईल ते"

- आलेख पाटणकर

अतिथी देवो भवः





भारत भले म्हणो आम्ही काही अमेरिकन पेक्षा कमी नाही.. पण मला वाटतं... आपण कमीच नाही तर आपण त्यांचे नोकर आहोत आणि नोकर म्हणूनच राहणार.... कोण म्हणतं इंग्रज गेले.... 
आताच घडलेला अनुभव सांगतो....

आमच्या ऑफिस मध्ये ८ लिफ्ट आहेत त्यातला ३ ह्या ८ व्या मजल्या वर जातात.... मी आलो तेव्हा माझ्या समोर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून २ गोरे आणि एक सावळा ब्लेजर घातलेला माणूस उतरला....
तर ह्या ३ लिफ्ट मधली एक लिफ्ट एका लिफ्टमन ने थांबवून ठेवलेली... पुढील अनुभव मी आधीच घेतल्या मुळे मी उरलेल्या २ लिफ्ट समोर थांबलो. बरं आधीच एखाद्या लिफ्टचा दरवाजा उघडा असेल तर तुम्हाला दुसऱ्या लिफ्ट पण बोलावता येत नाहीत....
तितक्यात हे गोरे आले. आणि त्या मागून ब्लेजर घातलेला एक नोकर म्हणजे भारतीय आला.. अर्थात तो इतर नोकरान मधला राजा होता...
ते जसे आलेत तसे पहिल्या लिफ्ट चे लाईट लागलेत.. आणि ते गोरे लिफ्ट मध्ये घुसले. तितक्यात तिथे माझ्या सारखा एक नोकर उभा होता.. त्याला वाटला हि लिफ्ट वर जाईल म्हणून तो त्या लिफ्ट मध्ये घुसायला गेला... तर त्याला तिथल्याच एका भारतीयाने अडवले आणि सांगितले
"ये लिफ्ट आप के लिये नाही है. आप दुसरे लिफ्ट से जाओ"

मला सांगा तुम्ही गेलात बाहेरगावी तर तुमच्या साठी होईल का हो हे सगळे?

बरे हे आजकाल भारतात सगळी कडे घडतंय....मला इतकाच सांगायचं अतिथी देवो भवः हे सगळे ठीक आहे हो फक्त ते "अति अतिथी देवो भवः" नको व्हायला देऊत...

-आलेख पाटणकर

give and take policy






आपल्या मनात कधी आले कि एखाद्या व्यक्ती ने आपल्या साठी खूप काही केलंय आणि आपण सुद्धा त्या साठी काही तरी केलं पाहिजे... 
त्या वेळी आपल्या मनात असे का येते कि त्या माणसासाठी आपण थोडे तरी काही केले पाहिजे... म्हणजे असे का नाही येत कि आपण सुद्धा भरपूर काही तरी केले पाहिजे....

विचार करा... नवल वाटेल...

-आलेख पाटणकर

निर्णय....




निर्णय....

मी बरीच माणसे पाहिल्येत जी निर्णय घेताना फार घाबरतात.. म्हणजे त्याचा परिणामाचा विचार ह्यांच्या मनात निर्णय घ्यायच्या आधीच येतो... परिणाम एक तर वाईट असेल किंवा चांगला.... परिणाम जर वाईट असेल तर माणूस निर्णय घेतच नाही... एकंदरीत काय तर सगळा गोंधळ हा रिस्क घेण्याचा आहे....

माझ्या मनात हा विचार काल घोटाळत होता... आणि मला त्याचे उत्तर पण मिळाले...

मला वाटतं माणसाने परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा.. म्हणजे परिणामाकेडे पूर्णपणे डोळेझाक करून नाही....
कारण माणसाने सगळ्यात मोठी रिस्क हि तो जन्म घेतानाचा घेतलेली असते... त्याला जन्माचा शेवट हा पूर्णपणे माहित असतो... आणि तो म्हणजे मृत्यू..... जो अटळ आहे...

मग जर तुम्ही तेव्हा निर्णय घेऊ शकलात तर आयुष्यात बाकीच्या वेळी का नाही...

विचार करा आणि पटलं तर लाईक आणि शेअर नक्की करा...


ह्या वरून मला रतन टाटाचे एक वाक्य आठवते...

I never take right decision…
I take decision and then I make it right….

-आलेख पाटणकर

धंदा...



धंदा...

काय गेलं ना लगेच आजच्या पोस्ट कडे लक्ष.....

खरं तर धंदा हे बरयाच मराठी मध्यमवर्गीय आणि इतर भाषिक लोक्कांचे रात्री झोपताना पहावयाचे आवडते स्वप्न.. पण खरं सांगू धंदा करणे हे काही खायचे काम नाहीये.आपल्याला दिसतो तो फक्त मिळणारा पैसा. दिसत नाही ते कष्ट, हेवेदावे, मत्सर....

परवाचाच अनुभव शेअर करतो...

मी बाजारात वाट पहात उभा होतो... माझ्या पुढे एक मुलगा देवीच्या वेणीची टोपली घेऊन फिरत होता... टोपली हातात घेण्या सारखी होती म्हणून तो फिरत होता... फिरता फिरता दमला म्हणून तो एका ठिकाणी उभा राहिला.. वय असेल जेमतेम १५ वर्ष.... आता हा माझ्याच बाईक समोर टोपली घेऊन उभा राहिला..... १५-२० मिनिटं मी म्हणालो पाहू तरी किती हा विकतो ते....
तेवढ्यात मागून एका बाईचा आवाज त्याला आला.... "अरे हे भXX जा ना इथून"
माझी नजर त्या मुलावरून त्या बाई कडे गेली ...
तो आवाज होता त्याच्या मागे बटाटे आणि लसूण विकणाऱ्या बाईचा.....
तो मुलगा म्हणाला" अहो मावशी पण माझा धंदा आणि तुमचा धंदा वेगळा आहे हो"
तर मी म्हणाली "ते मला नको सांगू माझे गिराईक जातात तुझ्या मुळे"

त्या क्षणी वाटले पटकन बोलावे त्या बाईला... पण एकाला बोललात तर एकाच्या पोटावर पाय आणि दुसऱ्याच्या पोटाला मदत केल्या सारखे होते....

-आलेख पाटणकर
 

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे


!! श्री स्वामी समर्थ!!
आजचा फोटो हा आमच्या घरातल्या स्वामींचा आहे... आणि ते चित्र माझ्या मामा ने म्हणजे मोहन मामा ने काढलंय

आज जो मी स्टेटस शेअर करणारे तो तुम्हाला जरा खटकेल... पटणार नाही, खोटा वाटेल... पण ते एक सत्य आहे....

एखाद्या गोष्टी मधून आपण आपल्या फायद्या नुसार कसा बोध घेतो ते मी आज सांगणार आहे

मध्ये बिल्डींग च्या कामा निम्मित्त आमच्या बिल्डींग मधली माणसे एका सरकारी कार्यालयात गेलेली... काम काय आहे ते सांगितल्या वर तिकडच्या अधिकार्याने कामा बद्दल बोलणी चालू केलीत... थोड्या वेळाने अधिकार्याने देण्या घेण्या कडे आपला कल वळवला...

आता हे देणं घेणं आमच्या बिल्डींग मधल्याच्या पचनी पडत नव्हतं.. तितक्यात आमच्या बिल्डींग मधल्या एकाचे लक्ष त्या अधिकार्याच्या मागच्या भिंतीवर गेले.. तिथे स्वामींचा मोठा फोटो लावलेला... त्या गृहस्थाने त्या अधिकारायला विचारले ..... स्वामींचा फोटो लावलाय असे पैसे मागायला काही वाटत नाही का? (अर्थात हे ब्रष्टचार पाहून तिडीक आलेला माणूस असाच बोलेल)

तर त्या वर तो अधिकारी काय म्हणाला सांगू.....

तो म्हणाला "फोटो नीट पहिला नाही वाटते.. खाली वाचा काय लिहलंय. तर खाली लिहलंय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग स्वामी असताना कसली भीती"

त्या क्षणी आमच्या बिल्डींग मधले पैसे न देता उठलेत.......

आपल्या रक्तातच भ्रष्टाचार इतका भिनलाय... कि लोकपाल बिल पण काही भिघडवू शकणार नाही कारण ते बिल आणायचं आमचं विल पाहिजेना...

स्वामी आता तुम्ही पण नाही सुधारू शकणार

-आलेख पाटणकर

काय बोलू ग.. कसे ग बोलू


आजचा मजेशीर स्टेटस...
लोक्कं काय बोलतात आणि बोलतील ह्याचा खरच काही नेम नाही... 
मिळालाला भेटला म्हणणारे तर खूप महानग आहेत... 
"अरे मला मोबाईल भेटला ... "
अरे मोबाईल ला काय पाय आहेत का जो चालत येऊन तुला भेटेल...तसे अजून बरेच शब्द आहेत केसअ,दगडी, बुट.. वैगरे वैगरे

बरं आपण कोणा बद्दल, कुठे बोलतोय ह्याचा हि भान नसतं ह्या लोक्काना....
परवाचीच गोष्ट सांगतो.. रस्त्यात एक माणूस मोबाईल वर बोलत होता...

"अरे आमची ना देवी उद्या उठेल"
अरे तुझी देवी झोपलेली का ९ दिवस.......

मध्ये एकदा डी मार्ट मध्ये गेलेलो तिथे एक मुलगी एका मुलाला विचारात होती...
"शी... काय रे तू फोन का नाही उचलत.. मी किती miscall मारलेत तुला..."
अग कसा उचलेल तो... लागले नसतील का त्याला ते miscall....

त्या हून कहर म्हणजे गणपती मध्ये... मी आणि बायको दादर मध्ये फिरत होतो.. म्हणजे आपल्या मराठी माणसांचा बालेकिल्ला.....
तिथे एक मुलीने दुसरीला विचारलं... आणि ते ऐकून मी आणि बायको गारच पडलो...
ती म्हणाली तिच्या मैत्रिणीला "काय ग तुमचा गणपती कालच उचला ना"
बायको मला म्हणाली "उचला ना..... अरे ती काय body आहे का उचलायला"

-आलेख पाटणकर

घर, पैसा गाडी


आजचा मस्त स्टेटस..

लोक्कं म्हणतात मला माझ्या माणसांपेक्षा पैसा महत्वाचा आहे.. कारण पैस्याने मी घर घेऊ शकतो, गाडी घेऊ शकतो आणि बरेच काही....
मग
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जेव्हा त्या गाडीचा अपघात होतो आणि त्याला फोन वर हे कळवले जाते कि अपघात झालाय.. तेव्हा त्याच्या तोंडून हा प्रश्न पहिला का येतो कि कोणाला काही झाले नाही ना आणि दुसरा प्रश्न हा का असतो कि गाडीला काही झाले नाही ना?.....

मग महत्वाचे काय पैसे कि माणसं
-आलेख पाटणकर

शाळा


आता कानावर आलेला एक संवाद सांगतोय... 

आता एका टपरीवर मि सँन्डविच घेत होतो मागे एक बाई आणि एक पुरुष बोलत होते...

पुरुष: मग मुलीच्या लग्नाचे काही बघतयेस का?
बाई: अरे हो २ स्थळं आलेलीत.. एक बि काँम होता आणी एक ईंजिनिअर.
पुरुष: होता म्हणजे.
बाई: अरे तुला माहीतीये माझी मुलगी किती शिकलीये ते... ति मुलं ईतकी शिकलेली. कशी हीला निवडतील....
पुरुष: हंम्मम....
बाई: आणी निवडल तरी हि घरातली कामे छान करेल. पण तुला माहीतीये ना कुणी बोलुन दाखवलं नाही पाहिजे की मुलगी कमी शिकली आहे म्हणुन....
पुरुष: हो.. बोलतात हे मात्र खरयं...
बाई: ते पण सगळं सांभाळु रे पण एखाद्या दिवशी मुलगा पार्टीला गेला हाँटेलात गेला तर असे व्हायला नकॊ कि हि तिथे ईज्जत घालवेल.....

आता मला सांगा मुलगी शिकली नाही तर ह्यात दोष कोणाचा.... आई बाबांचा ना?
बरं ज्या बाईला आपल्या मुली वरच ईतका विश्वास नाही तर त्या मुलीला स्वताःवर किती असणार?

बुध्यांक



तरी हि मी सांगत होतो. माझा आणि ग्राहम बेल चा बुध्यांक सारखा आहे.... बस त्याने टेलिफोन शोधण्यात आयुष्य घालवले आणि मी नोकरी करण्यात घालवतोय... पण बुध्यांक सारखा आहे...

पण कोणी विश्वासच नाही ठेवला .
-आलेख पाटणकर 


माफ करा ग्राहम बेल साहेब... तुमच्या फोटो बरोबर माझा फोटो लावण्या इतकी माझी लायकी नाहीये. पण आज काल कोणाची पण तुलना कोणा मोठ्या बरोबर केली जातेय तर मी पण विचार केला आपली पण पोळी भाजून घ्यावी

Wednesday, November 7, 2012

एक टेस्ट शहाळ्याची- एक टेस्ट प्रेमाची...




प्रेम म्हण्याल्यावर गेले ना लक्ष पोस्ट कडे....

he loves me .. he loves me not.....

...म्हणत मुलाचे खरे प्रेम आहे कि नाही बघण्याचे दिवस गेलेत बहुदा.. आता मुली खूप वेगळ्या वेगळ्या टेस्ट घेतात.. पण अजून बरयाच बावळट मुली आहेत ज्यांना कळत नाही खरे प्रेम कुठले आणि खोटे कुठले..

परवाचाच मस्त अनुभव सांगतो... एका दुकानावर मी शहाळ घेतल प्यायला... एकटाच होतो तेव्हा, म्हणून मस्त एक शहाळे घेतले.... मलाई वाले....

तेवढ्यात एक कपल आले... एक बरा दिसणारा मुलगा होता आणि एकदम ठीकठाक दिसणारी मुलगी होती.... पहिल्यांदा पाहूनच मनात आले... हे टाईमपास कपल आहे.. पण म्हणालो बघू एक शहाळे टेस्ट घेऊन..

मुलगा म्हणाला... "कैसा दिया नारीयल"

भैया म्हणाला "ये २५ का और ये ३० का"

मुलगा म्हणाला "ठीक है २५ का देना...." माझे प्रेमाचे मोजमाप करायचे मशीन मनात तेव्हाच चालू झाले... आणि ते डेंजर कडे काटा फिरवत होते...

मग ते शहाळे त्याने मुली कडे दिले.. मुलगी म्हणाली "अरे मला एक घे ना"

मुलगा म्हणाला " नाही नाही एकच घ्यायचे"

मग त्याने अजून एक Straw घेतली आणि त्याच शाहाळयातून तो हि प्यायला लागला... आता तुम्ही म्हणाल अरे मग चांगलय ना... माझा पण काटा हळू हळू ग्रीन झोन कडे जात होता...

तेवढ्यात क्लायमेक्स आला..

पिऊन झाल्यावर मुलाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला" प्यायालीस ना आता २५ रुपये काढ ना..."

मुलगी म्हणाली मी नाही देणार.... शेवटी "पैसे काय वर घेऊन जाणार का" म्हणत मुलाने पैसे दिलेत.....

माझ्या मनातल्या प्रेम टेस्ट करायच्या मशीनचा काटा डेंजर झोन तोडून बाहेर उडाला होता....

तर अजून लग्न न झालेल्या मुलीने हे लक्ष्यात घ्या कि मुलगा खरा प्रेम करतोय कि शारीरिक आकर्षण आहे हे जाणून घायचं तर त्याला अश्या छोट्या छोट्या गोष्टीत टेस्ट करा... कारण आम्ही मुलं टाईमपास प्रेमावर पैसे उडवत नाही.. आणि खऱ्या प्रेमावर पैसे उधळताना मागे पुढे पण पहात नाही...

मग घेताय ना आजच शहाळ्याची टेस्ट...



-आलेख पाटणकर