Thursday, November 1, 2018

मोबाईल स्क्रीन

मोबाईलची स्क्रीन ही गोष्ट मला फार मजेशीर वाटते.... म्हणजे बघा मोबाईलची स्क्रीन तुम्ही आयुष्याच्या कोणत्या  टप्प्यात  आहात हे सांगून जाते...

बऱ्याचदा लिफ्ट मध्ये असताना, आजूबाजूला कोणी तरी फोन अनलॉक करत. आपलं लक्ष तो लाईट खेचून घेतो... त्या माणसाचा वॉलपेपर दिसतो....

आता माझे निरीक्षण

आपल्याला बऱ्याचदा कॉलेज मध्ये मोबाईल मिळतो. त्या वेळी आपला वॉलपेपर असतो. आपलाच एखादा हिरो सारखा दिसणारा फोटो.....

मग आपण प्रेमात पडतो किंवा पडत नाही... प्रेमात पडलो तर आपल्या वॉलपेपर ची जागा GF किंवा BF चा फोटो घेतो जो घरी जाताना बदलला जातो. नाहीच पडलो प्रेमात तर पहिली कंडिशन अजून ही चालूच असते...

मग लग्न होतं... त्याच मुलीबरोबर झालं, तर आता वॉलपेपरची जागा दोघांचा मिळून काढलेला एखादा छानसा फोटो घेतो... दुसरी बरोबर झाले तर पहिलीचे फोटो डिलीट असतात... आणि दुसरी बरोबरचे फोटो, वॉलपेपरला असतात... आणि हो हो नाहीच झालं लग्न, तर पहिली कंडिशन अजून ही चालूच असते....

बायको बरोबरचा फोटो जास्त दिवस टिकत नाही, कारण मग मुलं होतात.... मग वॉलपेपरची जागा एखादया गोंडस बाळानी घेतलेली असते.... ही फेज बरेच दिवस राहते...

मग आपण आजी आजोबा होतो आणि मुलाच्या फोटोजागी नातू किंवा नातं जागा घेते.....

शेवटी शेवटी मात्र ही जागा देवाचे फोटो घेतात....

बघा तुम्ही पण निरीक्षण करून......

-आलेख पाटणकर

टीप:
1.अर्थात हे माझे निरीक्षण आहे, हे चुकूपण शकते....

2. माझ्या मोबाईलवर माझाच फोटो आहे कारण मी स्वतःला अजून कॉलेजमधलाच समजतो....

Wednesday, August 29, 2018

शेवटी लहान मुलीच त्या

अगदी काल घडलेल्या दोन गोष्टी... म्हणजे गाभा एकच पण संदर्भ वेगळा...
आमच्या बिल्डिंगमध्ये एक फॅमिली आहे. त्यांना दोन मुली आहेत. पालक उच्च हुद्यावर आहेत. नोकरी जास्त महत्वाची असावी इतर गोष्टींन पेक्षा.. आता हे आम्हाला माहीत झालं. बिल्डिंग मधल्या इतर बायकांकडून...

तर झाले असे की नोकरीमुळे मुलींना वेळ देता येत नाही म्हणून मुलींना पाठवले जातेय बंगलोरला....
शेवटी लहान मुलीच त्या... त्यांना ही काही तरी भावना असतीलच... पण त्याचा जास्त विचार होत नसावा... त्याचे प्रत्यंतर मला काल लिफ्टमध्ये आले... मी ऑफिसला जाताना त्या दोन मुली आणि त्यांची आई बॅगासकट माझ्या लिफ्टमध्ये आल्या... बाहेर आजी उभी होती टाटा करायला... मुली हिरमुसलेल्या... आजी ने टाटा केला...
आई ने जरा मुलींन कडे बघून आणि खोटं हसून म्हणाली... "SAY BYE BYE TO NANI..."
मुली आजी कडे न पाहता बाय म्हणाल्या... अश्या वेळी मुलांना जे घडतंय, त्यातून बाहेर काढू शकतील असे देवदूत म्हणजे आजी आजोबा वाटत असतात... त्यात आजी ने पण टाटा केलाय म्हणजे सगळं संपले... मग लिफ्ट बंद झाली आणि होणारी गोष्ट टाळता येणारी शेवटची आशा पण अंधुक झाली....

मग आईने मुलींनकडे पाहिले आणि म्हणाली... "Why are you so nervous, you must be excited.. afterall it's new phase of your life"
त्या म्हणाल्या "YES WE ARE" आणि परत चेहरा शांत झाला.

मी असे नाही म्हणत जो विचार मी करतोय तो बरोबर आणि तिचे आई वडील चूक...अर्थात आयुष्यात प्रत्येक गोष्ट इमोशनली घेऊन चालत नाही. तर कधी कधी प्रॅक्टिकल पण विचार करावा लागतो....कदाचीत मी बाप झाल्यावर सगळ्याच गोष्टी इमोशनली घ्यायला लागलो असणार....

तिची आई जे सांगत होती ते बरोबर होत.. एका नवीन गोष्टीला सुरवात होती पण माणसाच्या स्वभावानुसार त्या बदलाला मुली मनापासून तयार नव्हत्या....

ह्याच विचारात मी बाहेर पडलो... आणि संध्याकाळी काम आटपून घरी आलो...
तर दुसरी एक मुलगी माझ्या लेका बरोबर खेळत होती...
मी लेकाशी खेळत होतो... ते बघून कदाचीत तिला तिच्या बाबांची आठवण झाली आणि ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली "UNCLE I AM FEELING SAD TODAY"
मी म्हणालो "BUT WHY"
ती म्हणाली "MY DAD GONE TO BANGALORE FOR SOME WORK AND HE HAS BEEN THERE FROM LAST THREE MONTHS AND I AM MISSING HIM LOT"

मला ते नाते जाम क्युट वाटले... मी तिला म्हणालो "THEN YOU MUST BE CALLING HIM EVERYDAY RIGHT?"

ती म्हणाली "YES UNCLE, BUT THAT 20 MINUTES ARE NOT SUFFICIENT FOR ME"

माझ्या डोक्यात परत सकाळच्या मुली आल्या... त्यांना नसेल का येत आई बाबांची आठवण तिथे गेल्यावर.....

-आलेख पाटणक

Wednesday, November 15, 2017

Advertisement

थोडा मोठा पण एकदा नक्की वाचा.... 

जाहिरात कशी असावी तर ती लक्षात राहील अशी असावी... मला विचाराल तर मला मनला भिडणाऱ्या जाहिराती खूप आवडतात.. त्या लक्षात राहतात... 

सध्या टीव्ही वर एक जाहिरात येते.. सोनी मॅक्स 2 ची.. इतकी सुंदर जाहिरात आहे ती..... वडील आणि मुलाच्या नात्यामधली जाहिरात आहे ती.... 

एक मुलगा हॉस्पिटलमध्ये येतो... डॉक्टर त्याच्या हातात त्याच्या बाबांचे रिपोर्ट देतात आणि सांगतात I AM SORRY.... मुलाच्या डोळ्या समोर एकदम पुढे घडणारे चित्र सरकते... तो बाबांना ठेवलेल्या रुम मध्ये येतो...

एक वॉर्डबॉय त्याच्या बाबांची दाडी करत असतो.
तो मुलगा वस्तरा स्वतः हातात घेतो आणि बाबांची दाडी करायला लागतो...आता त्यांच्यात बॉलीवूड च्या चित्रपटाचे डायलॉग चालू होतात...

बाबा त्या वस्तराकडे बघून म्हणतात " ये बचो के खेलनेकी चीज नाही है... हात कट जाये तो खून आता है..."

मुलाला कळलेलं असते कि आता आपल्या बाबाना थोड्याच दिवसात देव म्हणजे तो पर्वतदिगार घेऊन जाणारे म्हणून तो बाबांकडे बघतो हसतो आणि म्हणतो
"ना तलवार कि धार से, ना गोलियो कि बौछार से
बंदा तो डरता है, तो उस पर्वतदिगार से"

आता बाबाना हि अंदाज आला असतो कि आपल्या स्टेज बद्दल मुलाला कळले आहे आणि तो उगाच आपल्याला बरं वाटावे म्हणून हसण्याचा आव आणतोय... तेव्हा बाबा म्हणतात...
"तुम जिस स्कुल में पडतो हो उस स्कुल के हम प्रिन्सिपल रेह चुके है"

मग मुलगा म्हणतो...
"आज तक तुम बोलते आये हो और मै सुनते आया हू... आज मै बोलुंगा और तुम सुनोगे... गर्दन उपर....."

आता बाबाला पूर्ण खात्री होते त्याच्या रिपोर्ट ची आणि तो डोळे मिटून म्हणतो....
"डॉन जखमी हुआ तो क्या हुआ फार भी डॉन है..."

आता मुलाच्या डोळ्यातून पाणी येते... ते त्याचे बाबा नीट कळतं ते मुलाकडे पाहून म्हणतात
"जिंदगी और मौत उपर वाले के हात में है जहाँपना... "

आणि मुलगा रडत रडत त्याच्या बाबाना मिठी मारतो..... त्या मिठीत जे प्रेम दिसत ते खूप काही सांगून जात...

आणि शेवटी सोनी मॅक्स चा नाव येत आणि टॅग लाईन येते कुछ फिल्मो का जादू कभी कम नही होता . #सोनीमॅक्स२ याद रहेगा "

जाहिरात मनाला एवढी टच करून जाते कि विचारू नका... विशेषतः मुलाचा आणि वडिलांचे नातेच वेगळे असते आणि ते इतके सुंदर दाखवले आहे...

मोठं होताना वडिलांचा तिरस्कार करणारा मुलगा... जेव्हा वडील जाणार आहेत हे कळते तेव्हा ते नाते किती हि वाईट असू देत.. तो मनातून कोलमडतोच.... आणि तेच जर नाते आधी पासून घट्ट असेल तर तो कोसळतो...
कोलमडणे आणि कोसळणे ह्यात बराच फरक आहे...
कोलमडणार माणूस थोड्यावेळाने उभा राहू शकतो पण कोसळलेल्या माणसाला उभे राहीला थोडा वेळ लागतो....

प्रत्येक फॅमिली मध्ये जर आई हि भिंत असेल तर वडील हे एक अदृश्य पिलर असतात..
त्याच्या बद्दल एखाद्या वेळेस त्यांच्या मुलाच्या मनात भाव दिसणार नाहीत पण त्यांच्या बदल त्यांच्या मुलाच्या मनात प्रेम आणि आदर हा असतोच..

-आलेख पाटणकर

वडिलांची किंमत आताच जाणून घ्या... नही तर ती व्यक्ती नसताना त्यांची कमी जाणवेल आणि मग पश्चाताप करण्या शिवाय हातात काही नसेल.

Friday, October 20, 2017

Indian

वेळ काढून वाचावा असा स्टेटस...
अगदी परवा घडलेला किस्सा...
परळ च्या फिनिक्स मॉल वरून टॅक्सी पकडली... रस्त्यात ट्रॅफिक होतं, अर्थात नेहमी प्रमाणे....
नशिबाने टॅक्सी ड्राइवर बोलका मिळाला.... बहुदा तो पण बराच वेळ भाड्याची वाट पाहत होता... त्या मुळे त्याला ही गप्पा मारायच्या होत्या ...
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला "साहेब तुम्हाला वाटत का, की दिवाळी आलीये"
मी म्हणालो "म्हणजे"
त्याने बाहेर हात केला आणि म्हणाला "आम्ही लहान असताना दिवाळीच्या चार दिवस आधी फटाके लावायचो. दिवे तर एक आठवडा आधी पासून लावायचो... आम्ही राहायचो तो रस्ता छान लाईट ने चमकून निघायचा"
मी म्हणालो हो आता बरेच सण कमी झाले आहेत
तो म्हणाला "हे चांगलं नाहीये ना पण सर. सण हे कमी होता कामा नयेत... आणि दिवाळी सारखा मोठा सण तर बिलकुल कमी होता कामा नये...."
मी फक्त हम्म म्हणालो
तो म्हणाला "कोर्ट आणि बाकीचे पक्ष काय म्हणायचं ते म्हणू दे... लोककानी दिव्याच्या माळा तरी लावायला हव्यात"
परत माझ्या कडे उत्तर नव्हतं....
आता तुही म्हणाल ह्यात नवीन काय आहे...
तर ह्यात नवीन हे होत की तो ड्रायवर एक मुस्लिम होता.... आणि त्याला आपल्या सणाची काळजी होती......
तेव्हा मनात विचार आला.... दोन धर्मातली भांडणे ही फक्त ऑनलाइन किंवा एखाद्या पक्षाच्या नादात आल्यावरच होतात.... बाकी सगळी कडे सगळे एकत्रच आहेत
-आलेख पाटणकर

Monday, January 23, 2017

कधी कधी अबोला नात्यात जास्त प्रेम आणतो...

Chandrashekhar Gokhaleच्या कथा वाचून मी पण विचार केला कि आपण पण एक प्रयत्न करावा एक छोटी सी लाव स्टोरी लिहायचा... प्लिज गोड मानून घ्या... 

तो सकाळी त्याच्याच विचारात उठला.. डोक्यात असंख्य कामं चालू होती... त्याच विचारात त्याने ब्रश करून लॅपटॉप लावला... आणि काम करू लागला... तेवढ्यात तिथून ती आली.. तिच्या डोक्यातच नाही तर हातातून पण कामे होत होती... तिनी त्याच्या कडे पाहिले हि नाही आणि पटकन त्यालाएक काम सांगितले... त्याने लॅपटॉप च्या स्क्रीन वरून हळूच तिच्या कडे रागाने पाहत.. परत काम करायला लागला...

तिनी परत त्याला तेच काम सांगितले.. ह्याचा सकाळीच रागाचा भडका उडाला.. काही हि ना बोलता तो लॅपटॉप ची स्क्रीन आपटून कामाला लागला.... तिच्या दृष्टीने त्याचे काम महत्वाचे नव्हते... आणि त्याच्या दृष्टींनी तिचे काम...

तिथेच दोघांना मध्ये काही ना बोलता खटका उडाला.... आता तो हि गप्प आणि ती हि... तिनी ह्याच्या रोजच्या वागण्याचा, रागाने विचार करत कपाटाला एक ड्रेस खेचून काढला... आता नशीब म्हणा कि काय नेमका त्याने तिच्या साठी सिलेक्ट केलेलाच ड्रेस निघाला....

दोघे तयार होऊन ऑफिस ला निघाले

.... अबोला अजून हि कायम होता.... रागामुळे आपण कसे दिसतोय ह्या कडे पण तिचे लक्ष नव्हते... दोघे हि तसेच ऑफिसला गेले...

ऑफिस मधून आल्यावर एक गोष्ट दोघांनी सांभाळून ठेवलेली ती म्हणजे अबोला..

तो दिवस तसाच गेला.... "रात गई बात गई" ह्या हिशोबाने दोघे हि जागे झाले आणि आपापल्या कामाला लागले... ऑफिस तयारी चालू झाली म्हणजे एकंदरीत रुटीन तेच होते.... फरक फक्त इतकाच होता कि आता
अबोल्याची जागा शब्दांनी घेतली होती...

दोघे हि ऑफिस ला निघाले... ती मनात म्हणत आज काल ह्याचे लक्षच नसते माझ्या कडे...

तो हि बाईक वर बसताना हेल्मेट घालता घालता तो पटकन बोलला.. "काल ड्रेस मध्ये छान दिसत होतीस"..

मनात तो त्याच्या दोन्ही सिलेक्शन वर खुश होता ... ड्रेस आणि ती हे दोन्ही त्याचेच तर सिलेक्शन होते...

ती काही ना बोलता स्कुटर वर बसली आणि पुढे गेली... ह्याच्या मनात विचार आला कि हिला आज काल आपण काही चांगलं बोललो तर फरक पडतो का? कि हिचे आता प्रेम कमी झालेय...

हा विचार चालू असतानाच तिची स्कुटर थांबली.. त्याने स्कुटर च्या आरश्यातून पाहिले तर ती हसत होती... तिनी मागे वळून पाहिले आणि म्हणाली "काल ऑफिस मध्ये पण सगळे तेच म्हणाले कि आज छान दिसते आहेस"

तो मनात हसला बाईक च्या आरश्यात स्वतःलाच पाहून खुश होत होता.....

कधी कधी अबोला नात्यात जास्त प्रेम आणतो...


Friday, December 30, 2016

सिग्नल

खूपदा असे होते... एखादा प्रसंग घडतो, एखादा माणूस येतो पटकन काही तरी बोलून जातो.... आणि खूप काही तरी शिकवून जातो...
तेव्हा तुमचा वर्षांनो वर्षांचा अनुभव, तूमचे वय, तुमचा हुद्दा काही म्हणजे काही मॅटर नाही करत..... कारण आयुष्याचा पेपर हा प्रत्येकाचा वेगळा असतो... आणि त्याची उत्तर पण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देतो...
त्याचे झाले असे, माझ्या टीम मध्ये एक मुलगा जॉईन झाला(SK Ainuddin)... अनुभवाने, वयाने माझ्या पेक्षा कमी...
मागच्या आठवड्यात आम्हाला दोघांना एकदम तहान लागली म्हणून आम्ही पाणी प्यायला गेलो.
ऑफिस मध्ये वॉटर प्युरिफायर आहे... ज्याला दोन नळ आहेत...
मी विचार केला... ह्याची मजा करू... म्हणून मी तो पोहोचायच्या आधीच धावत जाऊन एका नळा खाली ग्लास धरला... त्यामुळे त्याला दुसऱ्या नळा खाली ग्लास धरावा लागला...
मी त्याच्या कडे बघून हसलो आणि म्हणालो "क्या हुआ SK..."
त्याने माझ्या कडे पाहिले आणि मी पाणी भरत असलेल्या नळा कडे पाहिले आणि तो हसला... ते पण गालात...
मी नळ चालू केला तर त्यातुन पाणीच येत नव्हते...
मी म्हणालो "ऐसा कैसे हुआ SK..."
तो म्हणाला "क्यूँके आपने पहले सिग्नल को देखा नही और उसे value नही दि..."
आणि त्याने नळाच्या वर असलेल्या 3 लाईट कडे बोट दाखवले... ते बंद होते.. म्हणजे मागे पॉवर च नव्हती मशीन ला...
मनात आले देव पण आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला सिग्नल देतो... आपणच तो नो बघता आपला पेला भरायला जातो....
-आलेख पाटणकर

Monday, December 12, 2016

कसे बोलावे आणि कुठे

आपल्या इथे लोक्कांना काय बोलावे हे जसे कळत नाही तसे
कसे बोलावे आणि कुठे हे तर त्या हून कळत नाही....
मध्ये माझ्या एका मित्राच्या कृपेने हॉस्पिटलला जाणे झाले.... तिथे operation theater होते.मी फिरत फिरत तिथे गेलो.तर तिथे एका बाकड्यावर पेशंटचे नातेवाईक बसले होते.
तेवढ्यात एक wardboy एका बाईला operation साठी stretcher वरून घेऊन आला.मी तिथेच उभा होतो.
त्याने तिच्या नवरयाला हाक मारली. बाई अर्ध गुंगी मध्ये होती. कारण तिला कळत होते आजूबाजूला काय चाललय, कोण काय बोलतय. तसा ती प्रतिसाद पण देत होती. Operation पण छोटे होते.. ते गुंगीच्या प्रमाणावरून कळत होते.
तिचा नवरा तिथे आला. त्याने तिचा हात पकडला... तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलणार तेवढ्यात तो wordboy त्रस्त होउन म्हणाला...
"शेवटचे काही बोलायचं.....?" (त्याला म्हणायचे होते operation आधी काही बोलायचं... पण असो...)
ते ऐकून मी उडालोच... तिचा नवरा हि उडाला.... अर्ध गुंगीत असलेल्या बाईने आता पूर्ण डोळे उघडले होते...
आणि नवरयाने घट्ट पकडलेला हात आता आजूनच घट्ट झाला होता.....
-आलेख पाटणकर

Thursday, August 1, 2013

Final Destinantion


मोठा पण वाचण्या सारखा स्टेटस
"फ़ायनल डेस्टीनेशन" नावाचा एक इंग्रजी मध्ये चित्रपट येउन गेला. स्टोरी काय तर ५ मित्र असतात ते एका विमानात बसतात त्यातल्या एकाला दिसत कि ह्या विमानाचा अपघात होणारे. तो सगळ्या मित्रांना सांगतो आणी सगळे विमानातून उतरतात. थोड्या वेळाने खरच त्या विमानाला अपघात होतो सगळे मरतात. आता हे वाचतात. म्हणून मृत्यू त्याच्या मागे लागतो आणी ते ज्या क्रमाने विमानातून उतरतात त्या क्रमाने मरायला लागतात.

आता विचार करा हा चित्रपट भारतात बनला असता तर...
डायरेक्टर अर्थात राम गोपाल वर्मा. ५ मित्र ट्रेन मध्ये बसतात त्यात एक लहान मुलगा असतो. त्यातल्या एकाला दिसत कि ह्या ट्रेन चा अपघात होणारे. आणी सगळे उतरतात. होता काय तर त्या ट्रेन मध्ये ब्लास्ट होतो.
आता मृत्यू ह्यांच्या मागे लागतो. त्यातला एक मित्र बाईक ने जात असतो. रस्त्यात खडे चुकवता चुकवता त्याचा अपघात होतो तो मरतो. दुसरा मित्र ट्रेन ने प्रवास करत असतो.ट्रेन मध्ये गर्दी असते त्या मुळे ह्याला बाहेर लटकावे लागते त्यातच तो पडुन मरतो.
आता हे ऐकून तिसरया मित्राला हॉस्पिटल मध्ये admit करावे लागते. पण ambulance traffic मध्ये अडकते आणि हॉस्पिटल ला नेता नेताच त्याचे निधन होते. चौथी असते मुलगी. तिच्या वर रेप होतो त्यातच ती मरते. आता राहतो तो लहान मुलगा.
त्याला शाळेत जेवण दिले जाते ते खाउन विषबाधा होऊन तो हि मरतो.
आता कॅमेरा मृत्यू कडे वळवला जातो. मृत्यू पूर्णपणे गोंधळलेला असतो.
मग तो म्हणतो " अरे मी ह्याच्या साठि काही तरी वेगळेच ठरवलेले. हे तर किडा मुंगी सारखे मेले" . मग ते म्हणतो " ओके ओके हा भारत आहे ना. मग ठीक आहे इथे असेच मृत्यू येणार"

मला सांगा ह्या अश्या मृत्यूला काही अर्थ आहे का?
खरच भारतात मृत्यू ला इतके पर्याय आहेत आणि खंर तर ते उचित पर्याय नाहीत...

-आलेख पाटणकर

Thursday, January 24, 2013

Can you please


अमेरिकन लोक्कानी जगाला दिलेले ३ अतिशय सुंदर शब्द म्हणजे..

Thank you , Sorry आणि please

पण आपण भारतीय आपल्या फायद्यासाठी इतक्या सराईत पणे ह्या ३ शब्दांना वापरतो... Thank you आणि Sorry हे शब्द तर बोलताना कमीच दिसतील आणि त्याहून मना पासून बोलणारे तर नगण्य....

सगळ्यात वापरला जाणार शब्द म्हणजे प्लीज...

आपल काम समोरच्या ने करावे त्या साठी त्याची संमत्ती घेण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द... पण ते काम त्याने केलच पाहिजे हे मनात ठेवून जेव्हा प्लीज वापरले जाते तेव्हा बोलताना किंवा लिहिताना वाक्य असते

Aalekh please do this.

ह्या वाक्यात please आहे पण एक तर्फी माजोरपणा पण असतो कि हे करच....

आपण भारतीय please शिकलो पण त्यात अजून एक शब्द घालायला विसरलो तो म्हणजे Can you/May I ask you.

आता वरील वाक्य परत बघा

Aalekh can you please do this?
Aalekh may I ask you to do this?

मदत मागताना नेहमी समोरच्याची permission घ्या. कारण जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा तुम्ही मदत मागणारे एक भिकारीच असता ...

Diffrence between Can and May is, sometime you can but you may not.....

-आलेख पाटणकर

Thursday, November 8, 2012

CTRL +ALT +DEL





काल कॉम्पुटर वापरताना एक विचार डोक्यात आला....

कॉम्पुटर आणि आयुष्यात एक साम्य आहे... कॉम्पुटर आणि आयुष्यात जेव्हा प्रोब्लेम येतात तेव्हा आपण लगेच ते CTRL +ALT +Del करून एंड टास्क करायला जातो... पण प्रोब्लेम थोड्या वेळाने परत येतो. 
त्या पेक्षा "wait for program to respond " वर आपण थांबलो तर प्रोब्लेम आपोआप पण सुटतो आणि लगेच परत येत नाही...

काय म्हणता....... पटलं तर लाईक करा

- आलेख पाटणकर

सिंधुताई





मागच्या आठवड्यात "हफ्ता बंद" मध्ये सिंधुताई सपकाळ आल्या. आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी इतक सुंदर उत्तर दिलं.. मी परत एकदा त्यांच्या प्रेमात पडलो.....
मकरंद ने त्यांना विचारलं कि "माई आता मुली शिकल्या स्वताच्या पायावर उभा राहिल्या.. तुम्हाला वाटत का हो त्या स्वतंत्र झाल्यात?"

आता हा प्रश्न तुम्हा आम्हाला विचारला असता तर आपण बोललो असतो.. हो आहेत ना पण 

त्या वर सिंधुताई म्हणाल्या " कसं आहे ना बाळा.. त्या मुली शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या पण राहिल्यात रे.... पण त्या आता हे विसरल्यात कि आपण का शिकलो.. आणि आपल्या शिक्षणाचा समाजाला कसा फायदा होईल ते"

- आलेख पाटणकर

अतिथी देवो भवः





भारत भले म्हणो आम्ही काही अमेरिकन पेक्षा कमी नाही.. पण मला वाटतं... आपण कमीच नाही तर आपण त्यांचे नोकर आहोत आणि नोकर म्हणूनच राहणार.... कोण म्हणतं इंग्रज गेले.... 
आताच घडलेला अनुभव सांगतो....

आमच्या ऑफिस मध्ये ८ लिफ्ट आहेत त्यातला ३ ह्या ८ व्या मजल्या वर जातात.... मी आलो तेव्हा माझ्या समोर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून २ गोरे आणि एक सावळा ब्लेजर घातलेला माणूस उतरला....
तर ह्या ३ लिफ्ट मधली एक लिफ्ट एका लिफ्टमन ने थांबवून ठेवलेली... पुढील अनुभव मी आधीच घेतल्या मुळे मी उरलेल्या २ लिफ्ट समोर थांबलो. बरं आधीच एखाद्या लिफ्टचा दरवाजा उघडा असेल तर तुम्हाला दुसऱ्या लिफ्ट पण बोलावता येत नाहीत....
तितक्यात हे गोरे आले. आणि त्या मागून ब्लेजर घातलेला एक नोकर म्हणजे भारतीय आला.. अर्थात तो इतर नोकरान मधला राजा होता...
ते जसे आलेत तसे पहिल्या लिफ्ट चे लाईट लागलेत.. आणि ते गोरे लिफ्ट मध्ये घुसले. तितक्यात तिथे माझ्या सारखा एक नोकर उभा होता.. त्याला वाटला हि लिफ्ट वर जाईल म्हणून तो त्या लिफ्ट मध्ये घुसायला गेला... तर त्याला तिथल्याच एका भारतीयाने अडवले आणि सांगितले
"ये लिफ्ट आप के लिये नाही है. आप दुसरे लिफ्ट से जाओ"

मला सांगा तुम्ही गेलात बाहेरगावी तर तुमच्या साठी होईल का हो हे सगळे?

बरे हे आजकाल भारतात सगळी कडे घडतंय....मला इतकाच सांगायचं अतिथी देवो भवः हे सगळे ठीक आहे हो फक्त ते "अति अतिथी देवो भवः" नको व्हायला देऊत...

-आलेख पाटणकर

give and take policy






आपल्या मनात कधी आले कि एखाद्या व्यक्ती ने आपल्या साठी खूप काही केलंय आणि आपण सुद्धा त्या साठी काही तरी केलं पाहिजे... 
त्या वेळी आपल्या मनात असे का येते कि त्या माणसासाठी आपण थोडे तरी काही केले पाहिजे... म्हणजे असे का नाही येत कि आपण सुद्धा भरपूर काही तरी केले पाहिजे....

विचार करा... नवल वाटेल...

-आलेख पाटणकर

निर्णय....




निर्णय....

मी बरीच माणसे पाहिल्येत जी निर्णय घेताना फार घाबरतात.. म्हणजे त्याचा परिणामाचा विचार ह्यांच्या मनात निर्णय घ्यायच्या आधीच येतो... परिणाम एक तर वाईट असेल किंवा चांगला.... परिणाम जर वाईट असेल तर माणूस निर्णय घेतच नाही... एकंदरीत काय तर सगळा गोंधळ हा रिस्क घेण्याचा आहे....

माझ्या मनात हा विचार काल घोटाळत होता... आणि मला त्याचे उत्तर पण मिळाले...

मला वाटतं माणसाने परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा.. म्हणजे परिणामाकेडे पूर्णपणे डोळेझाक करून नाही....
कारण माणसाने सगळ्यात मोठी रिस्क हि तो जन्म घेतानाचा घेतलेली असते... त्याला जन्माचा शेवट हा पूर्णपणे माहित असतो... आणि तो म्हणजे मृत्यू..... जो अटळ आहे...

मग जर तुम्ही तेव्हा निर्णय घेऊ शकलात तर आयुष्यात बाकीच्या वेळी का नाही...

विचार करा आणि पटलं तर लाईक आणि शेअर नक्की करा...


ह्या वरून मला रतन टाटाचे एक वाक्य आठवते...

I never take right decision…
I take decision and then I make it right….

-आलेख पाटणकर

धंदा...



धंदा...

काय गेलं ना लगेच आजच्या पोस्ट कडे लक्ष.....

खरं तर धंदा हे बरयाच मराठी मध्यमवर्गीय आणि इतर भाषिक लोक्कांचे रात्री झोपताना पहावयाचे आवडते स्वप्न.. पण खरं सांगू धंदा करणे हे काही खायचे काम नाहीये.आपल्याला दिसतो तो फक्त मिळणारा पैसा. दिसत नाही ते कष्ट, हेवेदावे, मत्सर....

परवाचाच अनुभव शेअर करतो...

मी बाजारात वाट पहात उभा होतो... माझ्या पुढे एक मुलगा देवीच्या वेणीची टोपली घेऊन फिरत होता... टोपली हातात घेण्या सारखी होती म्हणून तो फिरत होता... फिरता फिरता दमला म्हणून तो एका ठिकाणी उभा राहिला.. वय असेल जेमतेम १५ वर्ष.... आता हा माझ्याच बाईक समोर टोपली घेऊन उभा राहिला..... १५-२० मिनिटं मी म्हणालो पाहू तरी किती हा विकतो ते....
तेवढ्यात मागून एका बाईचा आवाज त्याला आला.... "अरे हे भXX जा ना इथून"
माझी नजर त्या मुलावरून त्या बाई कडे गेली ...
तो आवाज होता त्याच्या मागे बटाटे आणि लसूण विकणाऱ्या बाईचा.....
तो मुलगा म्हणाला" अहो मावशी पण माझा धंदा आणि तुमचा धंदा वेगळा आहे हो"
तर मी म्हणाली "ते मला नको सांगू माझे गिराईक जातात तुझ्या मुळे"

त्या क्षणी वाटले पटकन बोलावे त्या बाईला... पण एकाला बोललात तर एकाच्या पोटावर पाय आणि दुसऱ्याच्या पोटाला मदत केल्या सारखे होते....

-आलेख पाटणकर
 

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे


!! श्री स्वामी समर्थ!!
आजचा फोटो हा आमच्या घरातल्या स्वामींचा आहे... आणि ते चित्र माझ्या मामा ने म्हणजे मोहन मामा ने काढलंय

आज जो मी स्टेटस शेअर करणारे तो तुम्हाला जरा खटकेल... पटणार नाही, खोटा वाटेल... पण ते एक सत्य आहे....

एखाद्या गोष्टी मधून आपण आपल्या फायद्या नुसार कसा बोध घेतो ते मी आज सांगणार आहे

मध्ये बिल्डींग च्या कामा निम्मित्त आमच्या बिल्डींग मधली माणसे एका सरकारी कार्यालयात गेलेली... काम काय आहे ते सांगितल्या वर तिकडच्या अधिकार्याने कामा बद्दल बोलणी चालू केलीत... थोड्या वेळाने अधिकार्याने देण्या घेण्या कडे आपला कल वळवला...

आता हे देणं घेणं आमच्या बिल्डींग मधल्याच्या पचनी पडत नव्हतं.. तितक्यात आमच्या बिल्डींग मधल्या एकाचे लक्ष त्या अधिकार्याच्या मागच्या भिंतीवर गेले.. तिथे स्वामींचा मोठा फोटो लावलेला... त्या गृहस्थाने त्या अधिकारायला विचारले ..... स्वामींचा फोटो लावलाय असे पैसे मागायला काही वाटत नाही का? (अर्थात हे ब्रष्टचार पाहून तिडीक आलेला माणूस असाच बोलेल)

तर त्या वर तो अधिकारी काय म्हणाला सांगू.....

तो म्हणाला "फोटो नीट पहिला नाही वाटते.. खाली वाचा काय लिहलंय. तर खाली लिहलंय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग स्वामी असताना कसली भीती"

त्या क्षणी आमच्या बिल्डींग मधले पैसे न देता उठलेत.......

आपल्या रक्तातच भ्रष्टाचार इतका भिनलाय... कि लोकपाल बिल पण काही भिघडवू शकणार नाही कारण ते बिल आणायचं आमचं विल पाहिजेना...

स्वामी आता तुम्ही पण नाही सुधारू शकणार

-आलेख पाटणकर

काय बोलू ग.. कसे ग बोलू


आजचा मजेशीर स्टेटस...
लोक्कं काय बोलतात आणि बोलतील ह्याचा खरच काही नेम नाही... 
मिळालाला भेटला म्हणणारे तर खूप महानग आहेत... 
"अरे मला मोबाईल भेटला ... "
अरे मोबाईल ला काय पाय आहेत का जो चालत येऊन तुला भेटेल...तसे अजून बरेच शब्द आहेत केसअ,दगडी, बुट.. वैगरे वैगरे

बरं आपण कोणा बद्दल, कुठे बोलतोय ह्याचा हि भान नसतं ह्या लोक्काना....
परवाचीच गोष्ट सांगतो.. रस्त्यात एक माणूस मोबाईल वर बोलत होता...

"अरे आमची ना देवी उद्या उठेल"
अरे तुझी देवी झोपलेली का ९ दिवस.......

मध्ये एकदा डी मार्ट मध्ये गेलेलो तिथे एक मुलगी एका मुलाला विचारात होती...
"शी... काय रे तू फोन का नाही उचलत.. मी किती miscall मारलेत तुला..."
अग कसा उचलेल तो... लागले नसतील का त्याला ते miscall....

त्या हून कहर म्हणजे गणपती मध्ये... मी आणि बायको दादर मध्ये फिरत होतो.. म्हणजे आपल्या मराठी माणसांचा बालेकिल्ला.....
तिथे एक मुलीने दुसरीला विचारलं... आणि ते ऐकून मी आणि बायको गारच पडलो...
ती म्हणाली तिच्या मैत्रिणीला "काय ग तुमचा गणपती कालच उचला ना"
बायको मला म्हणाली "उचला ना..... अरे ती काय body आहे का उचलायला"

-आलेख पाटणकर

घर, पैसा गाडी


आजचा मस्त स्टेटस..

लोक्कं म्हणतात मला माझ्या माणसांपेक्षा पैसा महत्वाचा आहे.. कारण पैस्याने मी घर घेऊ शकतो, गाडी घेऊ शकतो आणि बरेच काही....
मग
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जेव्हा त्या गाडीचा अपघात होतो आणि त्याला फोन वर हे कळवले जाते कि अपघात झालाय.. तेव्हा त्याच्या तोंडून हा प्रश्न पहिला का येतो कि कोणाला काही झाले नाही ना आणि दुसरा प्रश्न हा का असतो कि गाडीला काही झाले नाही ना?.....

मग महत्वाचे काय पैसे कि माणसं
-आलेख पाटणकर

शाळा


आता कानावर आलेला एक संवाद सांगतोय... 

आता एका टपरीवर मि सँन्डविच घेत होतो मागे एक बाई आणि एक पुरुष बोलत होते...

पुरुष: मग मुलीच्या लग्नाचे काही बघतयेस का?
बाई: अरे हो २ स्थळं आलेलीत.. एक बि काँम होता आणी एक ईंजिनिअर.
पुरुष: होता म्हणजे.
बाई: अरे तुला माहीतीये माझी मुलगी किती शिकलीये ते... ति मुलं ईतकी शिकलेली. कशी हीला निवडतील....
पुरुष: हंम्मम....
बाई: आणी निवडल तरी हि घरातली कामे छान करेल. पण तुला माहीतीये ना कुणी बोलुन दाखवलं नाही पाहिजे की मुलगी कमी शिकली आहे म्हणुन....
पुरुष: हो.. बोलतात हे मात्र खरयं...
बाई: ते पण सगळं सांभाळु रे पण एखाद्या दिवशी मुलगा पार्टीला गेला हाँटेलात गेला तर असे व्हायला नकॊ कि हि तिथे ईज्जत घालवेल.....

आता मला सांगा मुलगी शिकली नाही तर ह्यात दोष कोणाचा.... आई बाबांचा ना?
बरं ज्या बाईला आपल्या मुली वरच ईतका विश्वास नाही तर त्या मुलीला स्वताःवर किती असणार?

बुध्यांक



तरी हि मी सांगत होतो. माझा आणि ग्राहम बेल चा बुध्यांक सारखा आहे.... बस त्याने टेलिफोन शोधण्यात आयुष्य घालवले आणि मी नोकरी करण्यात घालवतोय... पण बुध्यांक सारखा आहे...

पण कोणी विश्वासच नाही ठेवला .
-आलेख पाटणकर 


माफ करा ग्राहम बेल साहेब... तुमच्या फोटो बरोबर माझा फोटो लावण्या इतकी माझी लायकी नाहीये. पण आज काल कोणाची पण तुलना कोणा मोठ्या बरोबर केली जातेय तर मी पण विचार केला आपली पण पोळी भाजून घ्यावी