Thursday, August 9, 2012

समाज एक घटक...


समाज हा वेगवेगळ्या घटकांनी बनलाय... काही घटक समाज बिघडवतात तर काही सुधरवतात किंवा कमीतकमी त्याला समांतर तरी ठेवायचा प्रयत्न करतात. पण माझे असे ठाम मतं आहे जेव्हा एक घटक समाज बिघडवत असतो तेव्हा दुसऱ्या घटकावर त
ो सुधरवण्याची जबाबदारी येते किंवा असं म्हणा कि तो समांतर ठेवणं हा त्या घटकाचा पोट्यापाण्याचा प्रश्न बनतो..
म्हणजे बघा हा.. जेव्हा एक घटक चोऱ्या,दरोडे,बालात्त्कार करत असतो तेव्हा त्यांना निट करायला पोलीस असतात... जेव्हा लोक रस्त्यावर पचापचा थुंकतात तेव्हा BMC एक घटक असा तयार करते कि तो ह्या लोक्काना पकडेल...
अर्थात हे घटक तयार करावे लागतात... पण काही घटक हे स्वताहून तयार होतात.. परंतु भारतात अजून असे हि काही समाज बिघडवणारे घटक आहेत कि ज्यांना सुधरवणारे घटक बनायचेत अजून...
तर हे सगळं सांगण्यामागे मी परवा घेतलेला अनुभव...

मी परवा बाईक ने जात होतो. माझ्या पुढून एक इनोवा जात होती. थोड्या वेळाने त्याची काच उघडली आणि आतून एक रिकामी बाटली फेकण्यात आली.. तर हा झाला समाज बिघडवणारा घटक... ते पाहून मला फार वाईट...
पण थोड्याच क्षणात एक बाई तिथल्याच फुटपाथ वरून उठली. तिच्या पाठीवर एक पोतं होतं... तिनी धावत जाऊन ती बाटली उचली आणि पोत्यात टाकली.तिच्या तोंडावर एक आनंद होता २ पैसे मिळाल्याचा.. आता हा झाला समाज समांतर ठेवणारा घटक...

आज आपला समाज जो काही समांतर आहे तो ह्या घटकां मुळेच... मी सलाम करतो अश्या घटकांना......

No comments: