Thursday, August 9, 2012

आजी,,,,,,,,,,,,,,,,,



परवा मी आजी बद्दल एक स्टेटस लिहिला आणि त्या वर खूप सारे लाईक आले आणि comments पण. त्या साठी आधी मना पासून धन्यवाद......
मी त्या पोस्ट वर एक पहिले, खूप ल
ोक्कांचा रिप्लाय आला कि आम्हाला आजी आजोबा नाहीयेत...

तर आज मी तुम्हाला अश्या एका आजीबद्दल सांगणारे जिचं माझ्याशी रक्ताचे किवा कौटुंबिक नाते नव्हते.... पण ती आजी होती..
त्या आजीचे नाव आहे मुणगेकर आजी... माझ्या मित्राची आजी ती .. आमच्याच शेजारी रहायच्या.... मला आज हि आठवतंय.. त्या मला आलेख एवजी अनिक नावाने हाक मारायच्यात....
उन्हाळ्यात त्यांच्या घरी गावा वरून आंबे यायचे.. आमच्या घरी आम्ही विकत आणायचो.... पण त्या आजी आमच्या साठी गपचूप पदरात लपवून ३-४ आंबे आणाच्यात... आणि मग बेल वाजवून म्हणायाच्यात "आनिक आहे का आनिक "... आणि मी आलो कि गपचूप माझ्या हातात ते ३-४ आंबे द्याच्यात.... जितके प्रेम त्यांचे त्यांच्या नातवांवर होते तितकेच प्रेम त्या आमच्या वर करायच्यात....

मग घरात एकदा कुकरची शिट्टी उडाली आणि त्या घटनेमुळे त्यांचा स्वतावरचा आत्माविश्वास पण गेला... मग काही वर्षांनी वयांमुळे त्या आजी पण गेल्या......
त्यांनतर बरीच वर्षे गेलीत.. बरेच उन्हाळेपण गेलेत..... आम्ही पण बर्याचदा आंबे आणलेत... पण त्या आजी ने देत असलेल्या आंब्यांची गोडी मी आणि माझा परिवार आज पण शोधत आहोत...

-आलेख पाटणकर

प्रेमाने फोन करायला किवां भेटायला तुम्हाला तुमचेच आजी आजोबा असले पाहिजेत हे गरजेचे नाही.....

हा फोटो त्या आजींचा नाहीये
 

No comments: